पश्चिम भारत विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी ऋषिकेश कबनूरकर यांची झाली निवड
कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क
२३ व २४ जानेवारी २०२५ रोजी पश्चिम भारत विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापुरातील ऋषिकेश कबनूरकर यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र, गुजरात गोवा, दिव दमण हवेली राज्यातील 150 वर खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. 140 हून अधिक अंतर्राष्ट्रीय फिडे रेटिंग धारक खेळाडूनी भाग घेतला. 10 फेरीत ऋषिकेशने 7,5 गुण मिळवून 10 क्रमांक मिळवला आणि त्या ची निवड ४ आणि ५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान नेरुळ नवीमुंबई येथे होणाऱ्या इंडिया चेस मास्टर या विभागीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली .
१६ खेळाडूंच्या मध्ये ही स्पर्धा होत असून या स्पर्धेत निवड होणाऱ्या स्पर्धकास ऑल इंडिया बुद्धिबळ स्पर्धेस नामांकित केले जाणार आहे.
ऋषिकेश कबनूरकर विवेकानंद कॉलेज 12 वीत शिकत असून फडणीस चेंबर्स शाहूपुरी येथील बुद्धिबळ प्रशिक्षक कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यास श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे मॅडम, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे सर यांचे प्रोत्साहन लाभले.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, या सर्वाचे मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment