रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत वालवालकर हॉस्पीटल-चैतन्य नेत्रालय तर्फे तपासणी शिबिर संपन्न

 रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत वालवालकर हॉस्पीटल-चैतन्य नेत्रालय तर्फे तपासणी शिबिर संपन्न  





 कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क 

 जबाबदारीने वाहन चालवणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे ही भावना वाढीस लागण्यासाठी गेले महिनाभर विविध उपक्रम चालू आहेत,यामध्ये आज शहर वाहतूक शाखेमध्ये नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले  पंत वालावलकर शिवाजी उद्यम नगर हॉस्पिटल व चैतन्य नेत्रालय यांच्यावतीने हे शिबिर संपन्न झाले . प्रारंभी पोलीस नंदकुमार मोरे यांनी सर्वांचे स्वागत स्वागत करत विद्यार्थ्यापासून  नागरिकांपर्यंत सुरक्षित वाहतुकीसाठी विविध प्रबोधनात्मक कार्य राबविण्यात आल्याची माहिती दिली तसेच खास पोलिसांसाठी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिराबद्दल आभार व्यक्त केले.

चाळशी नंतर प्रत्येकाने नियमित नेत्र तपासणी  करावीच मत यावेळी डॉ .विरेंद्र वणकुद्रे यांनी व्यक्त केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कोळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. जायटस ग्रुप रंकाळा चौपाटी तर्फे बबिता जाधव शुभांगी तावरे आरोग्य मित्र राजेंद्र मकोटे यांनी वाहतूक करण्यास झाड देऊन आभार मानले. यावेळी चैतन्य चे सुभाष मोरे विवेक घाडगे सह दिवाकर होवाळे सह मान्यवरउपस्थित होते .

Comments