' हिलझेन ' ची जुनाट आजारांवर संजीवनी- रुग्णांसाठी 'प्रो थेरप्युटीक प्रोटोकॉल' पद्धती विकसित - डॉ . कदम
' हिलझेन ' ची जुनाट आजारांवर संजीवनी- रुग्णांसाठी 'प्रो थेरप्युटीक प्रोटोकॉल' पद्धती विकसित - डॉ . कदम
कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क
डायबेटीस पासून कॅन्सर पर्य़ंत आणि रक्त घटकांच्या आजारांपासून प्रतिकार शक्ती पर्यंत जे दीर्घकालीन आणि जीवनशैलीचे आजार आहेत त्यावर पेशंट बरोबरच अनेक हॉस्पिटल आणि डॉक्टरना मदत करणारा हीलझेन - प्रो थेराप्युटीक प्रोटोकाल रुग्णसेवेसाठी सज्ज झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवत असलेल्या वैद्यकीय सेवा संस्था 'हीलझेन ग्रुप' चे 'हीलझेन क्लिनिक' आणि 'रिसर्च सेंटर' आता वैद्यकीय क्षेत्रात अमूलाग्र क्रांती करण्याच्या उद्देशाने पुण्या पाठोपाठ कोल्हापूर - इचलंकरजीत उपलब्ध होत आहे.
यामध्ये जुनाट व दुर्मिळ आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना आधार देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीसाठी 'हिलझेन' नावीन्यपूर्ण, एकात्मिक , सर्वसमावेशक तसेच पूरक उपचार पद्धती घेऊन रुग्णांच्या सेवेत दाखल होत असल्याची माहिती 'हिलझेन रिसर्च सेंटर' चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. एन. कदम यांनी पत्रकाराना दिली. यावेळी 'हिलझेन क्वांटम क्युयर' प्रायव्हेट लिमिटेड च्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. अपूर्वा अहिरराव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश कलके, मुख्य ऑपरेटींग ऑफिसर सुजित डोळस यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
हिलझेन क्लिनिक ची संकल्पना आणि उद्देश स्पष्ट करताना डॉ. कदम म्हणाले की, केवळ अनेकविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णानांच नव्हे तर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मदतीसाठी 'हिलझेन' ही वेगळ्या धर्तीवर काम करणारी संस्था पुणे मुख्यालयाचे टप्प्याटप्प्याने राज्यामध्ये कार्यरत असणार आहे.
डॉ. अपुर्वा अहिरराव माहिती देताना म्हणाल्या की, याबाबत आम्ही जुनाट आजाराबाबत मुंबईतील नामांकित रिसर्च सेंटरबरोबर संशोधन सुरू आहे.
कोल्हापूरात हीलझेन ची सेवा महिन्यातून एकदा , 303 एमराल्ड कॉर्नर , कॅसल हॉटेल रोड, दुसरी गल्ली राजारामपुरी आणि इचलकरंजीत डॉ . बडे हॉस्पीटल , राजदूत हॉटेल शेजारी , जवाहर नगर येथे होणार आहे. त्यासाठी +91 82083 09931 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन हिलझेन तर्फे करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment