मा. श्री. जगनाथजी शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कोहापूर जिल्ह्यात विक्रमी रक्त संकलन

 मा. श्री. जगनाथजी शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कोहापूर जिल्ह्यात विक्रमी रक्त संकलन 


कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क 

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना व महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटनेचे  अध्यक्ष आमच्या सर्वांचे लाडके केमिस्ट हृदय सम्राट मा. श्री. जगन्नाथजी शिंदे (आप्पा) यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस २९ जानेवारी २०२५ रोजी  साजरा होता आहे. यानिमित्त महाराष्ट्र राज्य संघटनेमार्फत  शुक्रवार दि. २४ जानेवारी २०२५ या  एकाच दिवशी राज्यभरातून ७५००० रक्त पिशव्या संकलन करण्याचा  एक अभूतपूर्व  उपक्रम हाती घेतलेला होता यासाठी  कोल्हापूर जिल्ह्यात शहर व तालुक्यातील  २७ ठिकाणी रक्त संकलन करण्यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करणेत आले होते  यामध्ये  जिल्ह्यातील सभासद त्याचे नातेवाईक व रक्तदाते यांनी या शिबीरास उत्स्फुर्त पणे  प्रतिसाद दिला  कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे 3500 पेक्षा जास्त रक्त पिशव्या संकलन करून ,महाराष्ट्र राज्या संघटनेने ७५००० रक्त पिशव्या संकलन करण्याच्य उपक्रमामध्ये अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे.

Comments