आंतरभारती चेसमास्टर शालेय बुद्धिबळ स्पर्धा :
विवान, अभय,प्रणव, दिविज अवनीश आघाडीवर
कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क
- चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने, आंतरभारती शिक्षण मंडळ व अरिहंत सोशल अँड एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या दहा व सोळा वर्षाखालील मुला-मुलींच्या शालेय बुद्धिबळ स्पर्धा आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाल्या.
कोरगावकर लॉन्स टाकाळा कोल्हापूर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सांगली,इचलकरंजी, जयसिंगपूर, बेळगाव, गडहिंग्लज चंदगड, गारगोटी, वारणानगर,निपाणी व स्थानिक कोल्हापूर येथील नामवंत 220 बुद्धिबळपटू सहभागी झाले आहे. दहा व सोळा वर्षाखालील मुला मुलींच्या स्वतंत्र गटा या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण सात फेऱ्यात होणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व आंतरभारती शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्ष सौ पल्लवी कोरगावकर यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जिनरत्न रोटे, संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे, सचिव एम एस पाटोळे, सध्या वाणी भरत शास्त्री, नेहा कानकेकर, भरत लाटकर, डी के रायकर, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, मनीष मारुलकर व आरती मोदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आज झालेल्या दहा वर्षाखालील मुलांच्या गटात पाचव्या फेरीनंतर अग्रमानांकित दिवेश कात्रुट व अवनीश जितकर चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. तर सोळा वर्षाखालील मुलांच्या गटात अग्रमानांकित इचलकरंजीचा विवान सोनी, तृतीय मानांकित जांभळी चा अभय भोसले व नववा मानांकित कोल्हापूरचा प्रणव मोरे पाच गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.
Comments
Post a Comment