आंतरभारती चेसमास्टर शालेय बुद्धिबळ स्पर्धा दिविज कात्रुट व विवान सोनी विजेते तर अवनीश जितकर व अभय भोसले उपविजेते ; अथर्वराज ढोले व अर्णव र्हाटवळ तृतीय स्थानी
कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क
चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने कोरगावकर लॉन्स,टाकाळा कोल्हापूर येथे आंतरभारती शिक्षण मंडळ व अरिहंत सोशल अँड एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतरभारती चेसमास्टर शालेय बुद्धिबळ स्पर्धेच्या दहा वर्षाखालील गटात अग्रमानांकित शांतिनिकेतन स्कूलच्या दिविज कात्रुट ने सात पैकी सात गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले तर पी आर मुंडरगी इंग्लिश मेडीयम स्कूल च्या अवनीश जितकरने सहा गुणासह उपविजेतेपद मिळविले. पोदार इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूरच्या अथर्व राज ढोले ला सहा गुणासह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.
सोळा वर्षाखालील गटात अग्रमानांकित पोदार इंटरनॅशनल स्कूल यड्रावच्या विवान सोनीने सात पैकी साडेसहा गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले तर तृतीय मानांकित ज्ञानगंगा हायस्कूल जयसिंगपूरच्या अभय भोसलेला साडेसहा गुणासह उपविजेतेपद मिळाले. सातवा मानांकित विमला गोयंका स्कूलच्या अर्णव र्हाटवळ ने सहा गुण मिळवून तृतीय स्थान निश्चित केले. दोन्ही गटातील विजेत्यांना,उपविजेत्यांना व तृतीय क्रमांकास अनुक्रमे रोख तीन हजार रुपये, दोन हजार रुपये व एक हजार रुपये सह आंतरभारती चेसमास्टर चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ जिल्हा परिषद कोल्हापूर चे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांच्या शुभ हस्ते झाला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुचिता ताई कोरगावकर, कार्याध्यक्ष पल्लवीताई कोरगावकर , सचिव एम एस पाटोळे, प्राथमिक सचिव संध्या वाणी, सहसचिव भरत शास्त्री, डी के रायकर, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, राष्ट्रीय पंच मनिष मारुलकर, आरती मोदी, धीरज वैद्य, उत्कर्ष लोमटे, विजय सलगर,प्रशांत पिसे, पल्लवी दिवाण, वृषाली कुलकर्णी, राजाराम सपकाळ, बाळासो कागले, संजय सौंदलगे व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
इतर बक्षीस विजेते पुढील प्रमाणे
दहा वर्षाखालील क्रमांक चार ते दहा चे मुख्य बक्षिस विजेते
4) श्वेतक होवल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांदेवाडी 5) कैवल्य पाटील तात्यासाहेब कोरे वारणानगर 6) आदिराज डोईजड तात्यासाहेब कोरे वारणानगर 7) विहान हर्डीकर पी.आर. मुंडरगी इंग्लिश मीडियम स्कूल 8) आरुष पाटील सर्वोदय जीवन गडहिंग्लज 9) अश्वत पाटील पोदार इंटरनॅशनल सांगली 10) शौर्य खावट साई इंग्लिश मीडियम स्कूल इचलकरंजी
सोळा वर्षाखालील क्रमांक चार ते दहा चे मुख्य बक्षीस विजेते
4) राजदीप राजेश पाटील कोल्हापूर पब्लिक स्कूल5) दिशा पाटील जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल जयसिंगपूर 6) श्रवण ठोंबरे देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल 7) व्यंकटेश खाडे पाटील सेवंथ डेज् स्कूल 8) अन्वय भिवरे माईसाहेब बावडेकर अकॅडमी 9) प्रणव मोरे एस एम लोहिया हायस्कूल 10) अथर्व अलदार सांगली हायस्कूल
उत्तेजनार्थ बक्षिसे पुढील प्रमाणे
सात वर्षाखालील उत्कृष्ट मुले
1) अद्वैत कुलकर्णी पोदार स्कूल कोल्हापूर 2) स्वरित गवंडी सायरस पुनावाला पेठ वडगाव 3) वृषांक माने राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल 4) जयराज काजवे यशवंत इंटरनॅशनल कोडोली 5) जयवर्धन भोसले सृजन आनंद विद्यालय
सात वर्षाखालील उत्कृष्ट मुली
1) रुतवा पोटे फादर एग्नेल स्कूल, चंदगड 2) आर्या पाटील शांतिनिकेतन स्कूल 3) इनया मुजावर प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर गडहिंग्लज
नऊ वर्षाखालील उत्कृष्ट मुले
1) आशुतोष कुलकर्णी एमईएस स्कूल 2) आदित्य राज निंबाळकर सर्वोदय जीवन गडहिंग्लज 3) ऋतुराज पाटील गंगामाई इचलकरंजी 4) हर्ष मादनाईक गंगामाई इचलकरंजी 5) आरंभ संकपाळ छत्रपती शाहू विद्यालय
नऊ वर्षाखालील उत्कृष्ट मुली
1) शनया मलानी किडझ् व्हिला इचलकरंजी 2) आरोही दिगोले आदर्श शिक्षण संस्था 3) शर्वरी होवल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांदेवाडी 4) अद्विता ऐतवडे पोदार स्कूल यड्राव 5) तनिषा चौगुले बड्स इंटरनॅशनल स्कूल
तेरा वर्षांपूर्वी उत्कृष्ट मुले
1) आदित्य घाटे छत्रपती शाहू विद्यालय 2) अर्णव पोर्लेकर न्यू हायस्कूल 3) सर्वेश पाटील वसंतराव चौगुले इंग्लिश मेडीयम स्कूल 4) हरीश ठोंबरे देशभक्त रत्नप्पा कुंभार हायस्कूल 5) वेदांत देसाई छत्रपती शाहू विद्यालय
तेरा वर्षाखालील उत्कृष्ट मुली
1) सिद्धी कर्वे जनतारा कल्पवृक्ष जयसिंगपूर 2) सृष्टी जोशी राव प्रायव्हेट हायस्कूल 3) आरोही बनसोडे छत्रपती शाहू विद्यालय 4) निधी पोटे फादर एग्नेल स्कूल चंदगड 5) दानवी पाटील जैन हेरिटेज स्कूल बेळगाव
पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट मुले
1) अरिन कुलकर्णी वसंतराव चौगुले इंग्लिश मेडीयम स्कूल 2) मलवित कांबळे वि स खांडेकर प्रशाला 3) अंशुल सुवेकर सेंट झेवियर्स हायस्कूल 4) अनय जोशी वि स खांडेकर प्रशाला 5) पियुष माने प्रज्ञा प्रबोधिनी सांगली
पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट मुले
1) अरिना मोदी पोदार स्कूल कोल्हापूर 2) स्नेहल गावडे पी आर मुंडर्गी इंग्लिश मीडियम स्कूल 3) अवनी कुलकर्णी माईसाहेब बावडेकर स्कूल 4) समिधा साळुंखे वसतराव चौगुले इंग्लिश मेडीयम स्कूल 5) वैभवी कुलकर्णी कौतुक विद्यालय

Comments
Post a Comment