टीरा स्टोअर्सवर मिळणार कोरियन TIRTIR ब्रँडचे ब्युटी प्रोडक्ट्स

 टीरा स्टोअर्सवर मिळणार कोरियन TIRTIR ब्रँडचे ब्युटी प्रोडक्ट्स



• भारतात पहिल्यांदाच स्टोअर्सवर TIRTIR उपलब्ध

• पाच स्टोअर्सपासून होणार सुरुवात

मुंबई ९ सिटी न्यूज नेटवर्क 

ब्युटी प्रोडक्ट्सच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आंतरराष्ट्रीय कोरियन स्किनकेअर आणि मेकअप ब्रँड TIRTIR आता भारतात रिलायन्स रिटेलच्या टीरा स्टोअर्सवर आपल्या ब्युटी प्रोडक्ट्सची विक्री करणार आहे. TIRTIR चे प्रोडक्ट्स भारतात पहिल्यांदाच स्टोअर्सवर उपलब्ध होणार आहेत. तसेच, ग्राहक हे प्रोडक्ट्स टीरा ॲपद्वारेही खरेदी करू शकतात.



कोरियन ब्रँड TIRTIR त्यांच्या इनोव्हेटिव्ह ब्युटी प्रोडक्ट्स, प्रीमियम गुणवत्ता, आणि उत्कृष्ट फॉर्म्युलेशनसाठी प्रसिद्ध आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर ग्राहक TIRTIR च्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. विशेषतः त्यांचा “मास्क फिट रेड कुशन फाउंडेशन” खूपच लोकप्रिय आहे.


TIRTIR ब्रँड टीरा स्टोअर्स आणि टीरा ॲपवर ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. सुरुवातीला पाच टीरा स्टोअर्सवर TIRTIR चे प्रोडक्ट्स उपलब्ध असतील:

जिओ वर्ल्ड ड्राईव्ह, मुंबई

डीएलएफ अ‍ॅव्हेन्यू, वसंत कुंज, दिल्ली

मॉल ऑफ एशिया, बेंगळुरू

इन्फिनिटी मॉल, अंधेरी, मुंबई

इन्फिनिटी मॉल, मलाड, मुंबई


TIRTIR चे लोकप्रिय प्रोडक्ट्समध्ये हायड्रेटिंग आणि रिफ्रेशिंग स्किनकेअर एसेंशियल मिल्क - स्किन टोनर, TIRTIR सिरॅमिक मिल्क एम्पुल: एक प्रीमियम स्किनकेअर सोल्यूशन आणि दीर्घकाळ टिकणारा मास्क फिट मेकअप फिक्सर यांचा समावेश आहे.

Comments