मुख्यमंत्र्यांकडून माणिक पाटील चुयेकरांच्या मागण्या मान्य सोमवारी पालकमंत्री अधिकृत घोषणा करणार
कोल्हापूर दि. २३ सिटी न्यूज नेटवर्क
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूरात खंडपीठ होण्यासाठी दसरा चौक येथे गेल्या ८ दिवसांपासून उपोषणास बसलेले पदवीधर मित्र माणिक पाटील- चुयेकर यांच्या या संदर्भातील सर्व मागण्या मान्य करत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या वतीने कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांचेकडून आज त्यांना सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी माणिक पाटील यांच्या मागणीनुसार कोल्हापूर सर्किट बेंचसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांची वेळ घेऊन लवकरात लवकर त्यांचेशी सर्किट बेंचविषयी चर्चा करणार असल्याचे सांगितले तसेच याबाबत कोल्हापूरातील लोक प्रतिनिधी, प्रमुख व्यक्ती, कृती समितीचे निवडक सदस्य, यांची मंत्रालयात संयुक्त बैठक घेतली जाईल असे सांगितले.
या प्रश्नावरील मुख्यमंत्र्याची भूमिका मांडण्यासाठी व मंत्रालयातील बैठकीची तारीख सांगण्यासाठी मुख्यमंत्र्याचे प्रतिनिधी म्हणून कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर हे सोमवार दि. २४ फेब्रु. रोजी सकाळी १०.३० वाजता लोकप्रतिनीधी, प्रमुख व्यक्ती व खंडपीठ कृती समिती सदस्य यांच्या उपस्थिीतीत उपोषण स्थळी भेट देणार आहेत. यावेळी सर्वांच्या मान्यतेने माणिक पाटील यांना सरबत पाजून त्यांच्या उपोषणाची सांगता करण्यात येणार आहे. आज उपोषण स्थळाला गोकूळचे संचालक बाबासाहेब चौगुले, डॉ. चेतन नरके, एस.आर. पाटील यांच्यासह मराठा आरक्षण कृतीसमितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, मेट्रोचे भरत पाटील, प्रा. मधुकर पाटील यांनी भेट देऊन पाठींबा दिला.

Comments
Post a Comment