प.पू. नरेंद्रचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेख करणार्या काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा स्व-स्वरूप संप्रदायाच्या वतीने निषेध
प.पू. नरेंद्रचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेख करणार्या काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा स्व-स्वरूप संप्रदायाच्या वतीने निषेध
कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हिंदु धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले साधू-संत, जगत्गुरु प.पू. नरेंद्रचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेक केल्याच्या निषेधार्थ स्व-स्वरूप संप्रदायाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी वडेट्टीवार यांच्या चित्राला चपलेचा हार घालण्यात आला, तसेच त्यांच्या छायाचित्रास ‘जोडे मार’ आंदोलन करण्यात आले. या वेळी वडेट्टीवार यांनी क्षमा मागण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी स्व-स्वरूप संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी, मधुकर बाबर, एम्.आर. पाटील, विजयकुमार पाटील, महिलाध्यक्ष प्रणाली पाटील, सीमा पाटील यांसह मोठ्या संख्येने महिला भक् तगण उपस्थित होते. या वेळी सर्वांनीच संतप् त प्रतिक्रिया व्यक् त करून ‘कोणत्याही परिस्थितीत संतांचा अवमान सहन करणारा नाही’, असे सांगितले. या प्रसंगी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. आनंदराव पवळ, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.

Comments
Post a Comment