अनंत अंबानी यांच्या वनतारा ला प्रतिष्ठित राष्ट्रीय ‘प्राणी मित्र’ पुरस्कार
जामनगर २७ सिटी न्यूज नेटवर्क
अनंत अंबानी यांच्या वनतारा संस्थेला भारत सरकारने ‘कॉर्पोरेट’ श्रेणीअंतर्गत प्राणी कल्याणासाठी दिला जाणारा भारतातील सर्वोच्च सन्मान, प्रतिष्ठित ‘प्राणी मित्र’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला आहे. हा पुरस्कार राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्ट (RKTEWT) च्या उल्लेखनीय योगदानासाठी देण्यात आला आहे. विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात भारत सरकारच्या मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वनतारा हा हत्तींच्या बचाव, उपचार आणि आजीवन देखभालीसाठी समर्पित असलेला एक संस्थान आहे. 998 एकर क्षेत्रफळामध्ये विस्तारलेल्या या वनतारा केंद्रात 240 हून अधिक वाचवले गेलेले हत्ती आहेत. त्यामध्ये सर्कशीतून सुटलेले 30 हत्ती, लाकूड उद्योगातून वाचवलेले 100 पेक्षा अधिक हत्ती तसेच सवारी व रस्त्यावर भीक मागण्यासाठी वापरले गेलेले हत्ती यांचा समावेश आहे. उपेक्षा व अत्याचार सहन केलेल्या या हत्तींसाठी वनतारा येथे जागतिक दर्जाचे पशुवैद्यकीय उपचार व देखभाल सुविधा उपलब्ध आहेत. येथे हत्तींसाठी जगातील सर्वात मोठे रुग्णालय देखील आहे. याशिवाय, हत्तींसाठी खास तयार केलेले तलाव व जकूजीसारख्या सुविधा देखील येथे आहेत.
वनतारा संस्थेचे सीईओ विवान करणी यांनी हा सन्मान स्वीकारताना सांगितले, “हा पुरस्कार त्या असंख्य लोकांना समर्पित आहे ज्यांनी भारतातील प्राण्यांच्या संरक्षण व देखभालीसाठी आपले जीवन वाहून घेतले आहे. वनतारामध्ये प्राण्यांची सेवा करणे हे केवळ आमचे कर्तव्य नाही, तर आमचा धर्म आणि सेवा आहे. भारताची समृद्ध जैवविविधता जतन करण्याच्या आपल्या मिशनसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.”
‘कॉर्पोरेट’ श्रेणीत प्राणी मित्र पुरस्कार मागील पाच वर्षांमध्ये प्राणी कल्याणासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या कंपन्या, सार्वजनिक उपक्रम, शासकीय संस्था आणि सहकारी संघटनांना प्रदान केला जातो. यामध्ये प्राणी कल्याण उपक्रमांसाठी समर्पित कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीचाही समावेश आहे.
वनतारा जगातील सर्वात मोठी हत्ती अॅम्ब्युलन्स सेवा देखील चालवते – ज्यामध्ये 75 विशेषतः डिझाइन केलेली वाहने आहेत. यामध्ये हायड्रॉलिक लिफ्ट, रबर मॅट फ्लोअरिंग, पाण्याची टाकी, शॉवर आणि केअरटेकर केबिन यांसारख्या अत्याधुनिक सुविधा असून, या वाहनांच्या मदतीने वाचवलेल्या हत्तींचे सुरक्षित पुनर्वसन केले जाते.

Comments
Post a Comment