पन्हाळा शिवस्मारकासाठी 10 कोटी मंजूर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.
आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्याला यश.
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
पन्हाळा येथील शिवस्मारकासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर कोल्हे केल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली
आमदार चंद्रदीप नरके यांनी अर्थ संकल्पीय अधिवेशनामध्ये पन्हाळा येथील शिस्मारकाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आणि त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी निधी द्यावा ही मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत मा. एकनाथ शिंदे यांनी शिवस्मारकासाठी तातडीने 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आदेश दिले, तसा शासकीय आदेश (जी. आर.) आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. या तातडीच्या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यतत्परतेचे दर्शन पुन्हा एकदा कोल्हापूर वसियांना झाले. या निर्णयाचे शिवप्रेमींनी स्वागत केले. आमदार चंद्रदीप नरके यांनी छत्रपती शिवरायांच्या पद स्पर्शानेपावन झालेल्या पन्हाळा गडावर सुंदर असं शिवस्मारक उभारण्याच्या कामाला या निधीमुळे गती मिळेल अशी भावना व्यक्त करत संपूर्ण करवीर मतदार संघातील व कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, नगरविकास विभागाचे अप्पर सचिव ओ. पी. गुप्ता आणि प्रधान सचिव गोविंदराज उपस्थित होते.

Comments
Post a Comment