समाजसेविका अनघलक्ष्मी दुर्गा यांचा तेजस बहुद्देशीय संस्था, नाशिक राज्यस्तरीय उंच माझा झोका 2025 पुरस्काराने सन्मान
समाजसेविका अनघलक्ष्मी दुर्गा यांचा तेजस बहुद्देशीय संस्था, नाशिक राज्यस्तरीय उंच माझा झोका 2025 पुरस्काराने सन्मान
कोल्हापूर ६ सिटी न्यूज नेटवर्क
तेजस बहुद्देशीय संस्था, नाशिक यांच्यातर्फे दरवर्षी कृषी, साहित्य, पत्रकारिता, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या गुणवंत व्यक्तींचा राज्यस्तरीय विविध पुरस्कारांनी सन्मान केला जातो. यंदा २०२५ या वर्षातील ‘राज्यस्तरीय समाज भूषण, उंच माझा झोका पुरस्कार नुकताच तेजस बहुद्देशीय संस्था, नाशिक पुरस्कार निवड समितीने अनघलक्ष्मी दुर्गा यांना जाहीर केलाआहे.
अनघलक्षमी दुर्गा ह्या समाज सेविका आहेत शिक्षण, आरोग्य, स्वच्छता , पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आहे यापूर्वी सुद्धा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे
त्यांनी समाजसेवेचा विडा उचललेला आहे त्यांनी या क्षेत्रांमध्ये एक गरुड झेप घेतलेली आहे व लोकांच्या मदतीला धाऊन जाणाऱ्या आदर्श महिला आहे. तसेच झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य यांना समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.कांताभाऊ राठोड संस्थापक अध्यक्ष आहेत,गोपाळ कळसकर हे जळगांव जिल्हा सचिव आहेत. यांना आदर्श पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. तसेच झेप फाउंडेशन पुणे पदाधिकारी अश्विनी आवळे मॅडम, अशोक पाटील सर, स्मिता भंगाळे मॅडम यांनाही समाजभूषण पुरस्कार मिळाला त्याचबरोबर शंकर जाधव सर , सामाजिक राजू पांचाळ सर यांना सुद्धा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
अनघलक्ष्मी दुर्गा यांनी समाज च्या माध्यमातून रोजगार मेळावे, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान ,महापुरुषांच्या विचारांचा प्रचार, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम, वृक्षलागवड असे विविध लोकहितोपयोगी उपक्रम त्यांनी राबवले आहेत.
नुकताच कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज स्मारक सभागृह, त्यांचा सन्मान व राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी तेजस बहुद्देशीय संस्था, नाशिक च्या संस्थापक अध्यक्षा तथा सिने अभिनेत्री, चित्रपट निर्माती , दिग्दर्शक मेघाताई डोळस, अशोक कपूर ( सिने अभिनेता व दिग्दर्शक, मुंबई ), सुरेशभाऊ डोळस (ज्येष्ठ सिने अभिनेते व लोक कलावंत, पुणे), नथानियल सुज्ञान राव शेलार (ज्युनिअर धुमाळ,कोल्हापूर), संदीप कुडचीकार (अभिनेता होम मिनिस्टर,सांगली ) तसेच महेंद्र तुपे (लेखक, कवी , छत्रपती संभाजीनगर आदि प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून विविध जिल्ह्यातून विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती त्यांना विविध क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
या पुरस्काराने विविध संस्थेतील, संस्थातून मित्रमंडळीकडुन समाज बांधवाकडून अभिनंदनचा चा वर्षाव होत आहे.


Comments
Post a Comment