जागतिक महिला दिनानिमित्त साने गुरुजी वसाहतीत महिलांचा विविध पैलूचा अविष्कार


जागतिक महिला दिनानिमित्त साने गुरुजी वसाहतीत  महिलांचा विविध पैलूचा  अविष्कार   





  कोल्हापूर ११ सिटी न्यूज नेटवर्क 

आजकाल च्या महिला स्वःताला चार भितींत न अडकता सर्वच क्षेत्रात हिरीरीने आपली ओळख जगासमोर आणतात . त्यांचा विशेष सन्मान म्हणून जगभरात ८ मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो त्याचाच एक भाग म्हणून सानेगुरुजी वसाहत महिला ग्रुप यांच्यासाठी विविध स्पर्धाचें आयोजण केले होते.



आयोजक म्हणून प्रिया शर्मा  ( प्रियाज ब्युटी पार्लर ) दिपाली जाधव (कॉस्मेटिक शॉप )आणि प्रिया बुलबुले ( बुलबुले कलेक्शन )याच्या वतीने हा कार्यक्रम  मेरि-गोल्ड लॉन येथे संपन्न झाला.

रेट्रो काळातील विविध गाणी आणि त्यावर केलेला नृत्याविष्कार यामुळे हा कार्यक्रम सर्वांना एक नवा प्रेरक अनुभव देणारा ठरला .आगामी काळात असे उपक्रम भव्य प्रमाणात आणि विविध घटकांना सहभागी करून संपन्न करण्याचा निर्णय या व्यक्त करण्यात आला .

Comments