गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बुद्धिबळ अकादमी चे उद्घाटन
कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर शहरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धिबळ पटू तयार व्हावेत आणि नवोदित खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दाभोळकर कॉर्नर येथील प्रसिद्ध सी ए दिलीप फडणीस यांच्या निवासस्थानी बुद्धिबळ अकादमीचे उद्घाटन संतोष अकोलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ .पोर्णिमा पाटील . राष्ट्रीय बुद्धिबळपटू शर्वरी कबनुरकर, अनुष्का पाटील सौ श्वेता कबनुरकर , कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे माजी सचिव कृष्णात पाटील शशिकांत कबनुरकर, सौ शांताबाई पाटील,सौ विमल पाटील उपस्थित होते.
तसेच प्रसिद्ध सीए दिलीप फडणीस साहेब यांच्या मार्गदर्शना खाली झाले या अकादमीचे कार्य सुरू असणार आहे.
या अकादमीला विशेष सहकार्य सी ए गौरव फडणीस तसेच सोहेल आणि महादेव यांचे ही लाभले आहे.
नवोदित आणि सर्वच बुद्धिबळ खेळाडूंना या अकादमीचे सहकार्य लाभेल असेही अकादमी च्या वतीने सांगण्यात आले.

Comments
Post a Comment