जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज भक्त सेवा मंडळ तर्फे भव्य शोभायात्रा ठरली लक्षवेधी
कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ कोल्हापूर यांच्या वतीने हिंदू नव वर्षा निमित्त शहरात भव्य कलात्मक शोभायात्रा काढण्यात आली . अत्यंत शिस्तबद्ध आणि कलात्मक रित्या निघालेल्या या शोभायात्रेतील विविध प्रबोधनपर फलकांनी आणि विविध देखावे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले . जिल्ह्यातील बारा तालुक्यातील भक्तगण यामध्ये सहभागी झाले होते . ही शोभायात्रा प्रायव्हेट हायस्कूल इथून सुरू होऊन मिरजकर तिकीट - बिनखांबी गणेश मंदिर - महाद्वार रोड - पापाची तिकटी - लुगडी ओळ - बिंदू चौक परत प्रायव्हेट हायस्कूल येथे विसर्जित झाली या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने भाविक भक्तगण आणि इतर लोक सहभागी झाले होते.
या शोभायात्रा - मिरवणुकी मध्येमोटरसायकल धारक - निशाण धारी महिला- पुरुष ढोल पथक- कलश धारी महिला-श्री राम पंचायतन- प्रभू रामचंद्र यांची मूर्ती- नऊ फुटी बजरंगी- तोफेच्या देखावा- मावळ्यांची वेशभूषा- छत्रपती शिवाजी महाराज -
धर्मवीर छत्रपती- शंभूराजे महाराज - झाशीची राणी -भजनी मंडळ -सहंत महंत यांच्या वेशभूषा सर्वांच्या लक्षवेधी ठरल्या .
प.पू.स्वामीजींची पालखी- अखिल भारतीय हिंदू संग्राम सेना सुरक्षिततेची सेवा- प.पू. माऊलींचा रथभक्तमंडळी महिला आणि पुरुष आदि चा सहभाग होता .मिरवणुक दरम्यान सर्वाना प्रसाद - पाणी वाटप करण्यासह स्वच्छता सेवाही नाणीज भक्तगणानी मनापासून केली .गत महिना भर यांच्या यशस्वी नियोजनासाठी अध्यक्ष कृष्णात माळी सह प्रणाली पाटील, एम आर पाटील, मधुकर बाबर,दिलीप कोळी, विजय धनावडे,कोने साहेब, ,अमोल पाटील, अमित लाड,विजय पाटील,माधुरी मोळे मनीषा मगदूम, लक्ष्मण पुणेकर यांच्यासह जिल्हा,तालुका पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतल

Comments
Post a Comment