कृष्णा स्नेह संवर्धिनी संस्था - राष्ट्र सेविका समिती आयोजित महिला भजन स्पर्धेत १८ संघ सहभागी - स्वराजंली विजेते
कृष्णा स्नेह संवर्धिनी संस्था - राष्ट्र सेविका समिती आयोजित महिला भजन स्पर्धेत १८ संघ सहभागी - स्वराजंली विजेते
कोल्हापुर २७ सिटी न्यूज नेटवर्क
करवीर नगर वाचन मंदिरात कृष्णा स्नेह संवर्धिनी आणि राष्ट्रसेमीसेविका समितीच्या संयुक्त संत मिराबाईंची भजने* हा विषय घेऊन कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यासाठी भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . या भजन स्पर्धेत शहर आणि जिल्हयातील एकूण 18 भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता . या स्पर्धेचे परीक्षण संगीत विशारद सौ . मुग्धा देसाई.. आणि स्मिता गोसावी यांनी केले होते . प्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका वंदनीय मावशी , भारतमाता , संत मीराबाई .भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले . या कार्यक्रमाचे प्रयोजन काय आहे सौ.अनघा नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकातून केले . सादरीकरणासाठी प्रत्येक भजनी मंडळांना १०मी . वेळ देण्यात आला होता. प्रत्येक मंडळाने संत मीराबाईंचे एक भजन आणि एक गवळण सादर केली. स्पर्धेचे नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करून केलेल्या परिक्षणानुसार खालील भजनी मंडळांनी यश संपादन केले .
यामधे
१ ) प्रथम क्रमांक : -स्वरांजली भजनी मंडळ,राजोपाध्येनगर
२ ) द्वितीयक्रमांक विभागून देण्यात आला :- १ ) स्वरदा भजनी मंडळ, राजारामपुरी
२ ) स्वामिनी भजनी मंडळ, सम्राटनगर
तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला : -१ ) शांभवी भजनी मंडळ, ब्रह्मेश्वर बाग
२ ) निरुपमा खेबुडकर भजनी मंडळ
याशिवाय उत्तेजनार्थ विघ्नहर्ता भजनी मंडळआणि राधाकृष्ण भजनी मंडळ, नागाळा पार्क यांना देण्यात आले .
सर्व भजनी मंडळांनी अतिशय उत्तम सादरीकरण केले .बहुतेक सगळ्यांनी पहिल्यांदाच अशा स्पर्धेत भाग घेतला होता.प्रत्येक सहभागी भगिनींना सहभाग प्रशस्तीपत्र दिले.
त्याचवेळी भजन सादर केल्यावर ज्या भगिनी दुसर्या हाॅलमधे बसल्या होत्या, त्यांच्यामधे भजनाची अंताक्षरी घेण्यात आली, त्यामुळे त्या सर्व भगिनींना खूप मजा आली.
कार्यक्रमाचे बक्षिस वितरण संस्थेच्या देणगीदार डाॅ.प्रा.सौ .प्रियांका कुलकर्णी.. व दोन्ही परीक्षक आणि संस्थेच्या सचिव सौ . प्राची जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. आभार प्रदर्शन सौ . प्राची जोशी यांनी केले . संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ . कविता जोशी व अनघा नाईक यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्र सेविका समितीच्या कोल्हापूर उत्तर , दाक्षिण व शहरच्या कार्यवाहिका सौ .डॉ . मुजुमदार , अनघा नाईक , प्रज्ञा परांजपे तसेच सर्व सेविकांनी अथक परिश्रम घेतले . त्यांना विभाग संपर्क प्रमुख सौ मेधा ताई जोशी यांचे मार्गदर्शन लाभले . कार्यक्रमाची सांगता 'जाग भगिनी मातृशक्ती जाग तू सखे ' या देशभक्तीपर प्रेरणा गीताने झाली . आगामी काळात व्यापक प्रमाणात या स्पर्धा आयोजित करण्याचा निर्धारित यावेळी व्यक्त करण्यात आला .

Comments
Post a Comment