पुढील कचरावेचक महिलांचा आनंदमेळावा राजवाड्यावर होणार - युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांचे प्रतिपादन

 पुढील कचरावेचक महिलांचा आनंदमेळावा राजवाड्यावर होणार - युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांचे प्रतिपादन.


कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क 

अवनि संस्था व किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लि अंतर्गत कोल्हापूर,सांगली,सातारा  जिल्ह्यातील कचरावेचक महिलांचा आनंदमेळावा आयोजन शाहु स्मारक येथे आयोजन करण्यात आले होते.अवनि संस्था हि गेली बारा वर्षे कचरावेचकांच्या आर्थिक विकिसासाठी कार्यरत  आहे.सदर मेळाव्यास बचत गट , कोआपरेटिव्ह चे काम तिन्ही जिल्हयात सुरु आहे त्यांच्या सक्षमीकरणाचा भाग म्हणुन किर्लोस्कर  कंपनीच्या CSR बजेट मधुन सदरच्या  आनंदमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कचरावेचकांच्या कामातुन पर्यावरणाला होत असलेला लाभ बघता त्यांना कचरावेचक म्हणण्याऐवजी स्वच्छता  दुत म्हणावे असे  या कार्यक्रमाच्या बीज भाषक जेष्ट पर्यावरण तज्ञ अनुराधा सामंत यांनी सांगितले या कामाबरोबरच आरोग्याची हि काळजी घ्यावी असे मार्गदर्शन केले.

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लि‌ कंपनीचे जनरल मॅनेजर- HR कागल प्लांट चे हरिष सैवे  यांनी येथुन पुढच्या पर्यावरणाच्या कामात किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लि नियमितपणे राहिल व प्रत्येकाने आपल्या डोक्यातील कचरा काढुन टाकावा व समाज सुधारण्यासाठी कार्य करावे व योगदान दयावे  असे त्यांनी यावेळी नमुद केले.सदरच्या आनंदमेळाव्याच्या अध्यक्ष म्हणुन बोलताना  युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी कचरावेचकांना कचरा वर्गीकरणाच्या जास्तीत जास्त सुविधा  उपलब्ध करुन देण्यासाठी मास्टर प्लॅन  बनवताना शहरातील विविध कार्यकर्त्याच्या सहभागातुन शहर स्वच्छतेला  प्राधान्य  दिले जाईल  ,तभेच कचरावेचकांचा पुढील आनंद मेळावा  राजवाड्यावर  होईल. तसेच आपल्या मार्फत सर्व कचरावेचक महिलांना छावा चित्रपट पहाण्यासाठी  नेले जाईल  असे त्यांनी नमुद केले.यावेळी   किर्लोस्कर ऑइल इंजिन्स चे  CSR प्रमुख शरद आजगेकर  यांनी सदरच्या  मेळाव्याला शुभेच्छा देवुन कचरा वर्गीकरण प्रवृत्तीकरणाचे काम केले जाईल अशी ग्वाही  दिली.याआनंद मेळाव्याचा  भाग  म्हणून कचरावेचक महिलांनी असामान्य ,कर्तुत्ववान  स्रीयांची  वेशभूषाची स्पर्धा पार  पडली .त्यामध्ये माता जिजाऊ, झाशीची राणी, सौदामीनी ताराराणी,माता रमाई,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, सिंधुताई संकपाळ, पी टी उषा,फातीमा शेख,मदर तेरेसा,अनुराधा भोसले यांची वेशभूषा करण्यात आली होती.


यावेळी या  असामान्य  महिलानी त्यांचे विचार मानले.त्यामध्ये पहिला वेशभुषा क्रमांक माता जिजाऊ  दृतीय क्रमांक झाशीची राणी,तृतीय क्रमांक  सिंधुताई संकपाळ यांना मिळाला.  या  दरम्यान सांगली जिल्ह्य स्मिता गायकवाड, सातारा जिल्हा  संगिता खुडे यांनी तेथील कामाचा आढावा सांगितला.अभ्यासिकेतील गुणवंत मुलांचा व वस्तीपातळीवर उत्कृष्ठ काम करणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुराधा भोसले अवनि संस्था अध्यक्षा यांनी केले.वेशभूषा स्पर्धा परिक्षक म्हणून अर्चना जगतकर मॅडम यांनी काम पाहिले तसेच Dr मंजुळा पिशवीकर,Dr अमरसिंह रजपूत,Dr रेश्मा पवार यांनी मेळाव्यास सहकार्य केले. व निवास नलवडे अध्यक्ष - जेष्ठ नागरिक सेवा संस्था उपस्थित होते. सदर मेळाव्यास सांगली,सातारा, कोल्हापूर येथील  ७०० महिला सहभागी होत्या.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयश्री कांबळे  यांनी केले.सदर आनंदमेळावा संपन्न होण्यासाठी जैन्नुद्दीन पन्हाळकर, संगिता जाधव, दिलशाद जमादार, साताप्पा मोहिते, वनिता कांबळे, पुजा लोहार, उमाकांत कांबळे, साहिल शिकलगार, सुभाष पाटील ,मनिषा कांबळे, अक्षय कांबळे, यांनी परिश्रम घेतले.

Comments