सौ.ज्योती बुवा तोरसकर यांना शिवाजी विद्यापीठाची पी एच डी (Phd) प्रदान
कोल्हापूर २३ सिटी न्यूज नेटवर्क
सौ.ज्योती बुवा तोरसकर यांना शिवाजी विद्यापीठाची इतिहास विषयातील डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली. मालवण येथील सामाजिक कार्यकर्त्या, संशोधक व शिक्षिका असणार्या ज्योती बुवा तोरसकर यांनी ' सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलदुर्ग: इतिहास आणि पर्यटन' या विषयावर संशोधन करून ph.d करिता प्रबंध सादर केला होता. याकरिता त्यांना न्यू कॉलेजच्या डॉ कविता गगराणी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ अवनीश पाटील , डॉ सुमेधा नाईक, श्री गुरुनाथ राणे, श्री लक्ष्मण वळंजू यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.


Comments
Post a Comment