पक्ष्यांसाठी पाण्याची सुंदर सोय : शहीद महाविद्यालयात मुलींना मातीची भांडी वाटप
कोल्हापूर (तिटवे) २७ सिटी न्यूज नेटवर्क
“ही केवळ मातीची भांडी नाहीत, तर निसर्ग आणि प्राणिमात्रांविषयीच्या आपुलकीची आणि संवेदनशीलतेची प्रतीकं आहेत. पर्यावरणासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची ही संधी आहे. विद्यार्थिनींनी या उपक्रमाचा सातत्याने अवलंब करावा,” असे प्रतिपादन प्राचार्य प्रा. प्रशांत पालकर यांनी चंद्रे या ठिकाणी पक्षांना मातीच्या भांड्यात पाणी ठेवताना केले.
उन्हाळ्याच्या तीव्रतेत तहानलेले पक्षीही त्रस्त होतात, हे लक्षात घेऊन महाविद्यालयातील विद्यार्थिनींना पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी मातीची भांडी वाटप करण्यात आली.
या उपक्रमाअंतर्गत, शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना मातीची भांडी देण्यात आली, ज्यात त्या आपल्या घराबाहेर, बाल्कनीत, अंगणात किंवा झाडांखाली पाणी ठेवू शकतील. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे उन्हाळ्यात पक्ष्यांना सहजपणे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देणे आणि विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये निसर्गप्रेम, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक बळकट झाली आहे. अनेक विद्यार्थिनींनीही आनंदाने भांडी स्वीकारत, आपल्या परीने पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचे वचन दिले.
यावेळी प्रा. सागर शेटगे, प्रा. दिग्विजय कुंभार,प्रा. विशालसिंह कांबळे, प्रा. वैभव कुंभार,प्रा. हर्षा उणे आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Comments
Post a Comment