दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

सोमवार, २१ एप्रिल २०२५





. चैत्र कृष्ण अष्टमी/नवमी. शके १९४६, संवत २०८१. ग्रीष्म ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.०० 


"आज उत्तम दिवस आहे" *काळाष्टमी*  


नक्षत्र - उ. षा./(दुपारी १२.३७ नंतर) श्रवण. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र प्रतियुती मंगळ, रवीशी केंद्र योग तर बुधाशी लाभ योग आहे. वक्तृत्व चमकेल. विक्री व्यवसायात यश मिळेल. मात्र वरिष्ठ नाराज होऊ शकतात. सरकारी नियम कसोशीने पाळा.  

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रवास घडतील. वाहन सुख लाभेल. अनपेक्षित लाभ होतील. नात्यात मतभेद संभवतात.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अष्टम स्थानी चंद्र आहे. सांभाळून पावले टाका. चैनीवर खर्च कराल. बोलताना काळजी घ्या.

 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल ग्रहमान आहे. सन्मान होतील. व्यवसाय आणि नोकरीत नैतिकता सोडू नका. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) षष्ठ स्थानात चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. व्यवसायात यश मिळेल. सन्मान मिळतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रिय व्यक्ती सोबत वेळ व्यतीत कराल. सहल घडेल. विनाकारण वाद वाढू शकतात. नोकरीच्या ठिकाणी कटकटीं निर्माण होऊ शकतात.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) घरगुती कामात व्यस्त व्हाल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन खरेदी होईल. अडचणीतून मार्ग सापडेल.

  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तृतीय चंद्र उत्तम अर्थ लाभ मिळवून देतील. व्यावसायिक यश लाभेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. कोर्ट कामात मात्र निराशा होऊ शकते. शत्रू पीडा जाणवेल.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कौटुंबिक सौख्य लाभेल. स्थावर संपत्ती वाढेल. शेतीची कामे मार्गी लागतील. खर्च वाढतील.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मेजवानी मिळेल. नात्यातून शुभ समाचार समजतील. अचानक लाभ होतील. कोर्ट कामात अपेक्षित यश मिळनार नाही. 


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यय स्थानी चंद्र आहे. महत्वाचे करार आज नकोत. आरोग्य विषयक कामांत वेळ जाईल. अनुकूल रवी, मंगळ आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करवतील. 


मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल चंद्र आहे. मौज कराल. प्रवास घडतील. मनासारखा दिवस व्यतीत होईल. 


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments