रिलायन्स जिओची फायर सेफ्टी मोहिम यशस्वीरित्या पूर्ण

 रिलायन्स जिओची फायर सेफ्टी मोहिम यशस्वीरित्या पूर्ण


पुणे २३ सिटी न्यूज नेटवर्क 

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची दूरसंचार शाखा असलेल्या रिलायन्स जिओने फायर सर्व्हिस सप्ताहानिमित्त आयोजित केलेली "अग्निसुरक्षा व प्रतिबंध मोहिम" यशस्वीरित्या पूर्ण केली. १४ ते २० एप्रिल दरम्यान साजऱ्या करण्यात आलेल्या या सप्ताहाचा समारोप रिलायन्स जिओच्या हिंजवडी, पुणे येथील कार्यालयात झाला.


या आठवड्याभरात विविध उपक्रम राबवले गेले, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी व सेवा भागीदारांसाठी मॉक ड्रिल्स आणि अग्निसुरक्षा प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले. हिंजवडी फायर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण देत आपत्कालीन परिस्थितीत कशी दक्षता घ्यावी हे शिकवले. कार्यालय परिसरात फायर सेफ्टी पोस्टरचे प्रदर्शन आणि जागरूकता साहित्याचे वितरण देखील करण्यात आले.


या उपक्रमाद्वारे रिलायन्स जिओने ‘शून्य आगीची घटना’ हे उद्दिष्ट निश्चित करत, त्यांच्या नेटवर्क साइट्सवर अग्निसुरक्षा वाढविण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच, पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण मोहिम देखील कार्यालय परिसरात पार पडली.


फायर सर्व्हिस सप्ताह भारतभर दरवर्षी १४ ते २० एप्रिल या कालावधीत साजरा केला जातो. १९४४ च्या विक्टोरिया डॉक स्फोटात शहीद झालेल्या ७१ अग्निशामकांच्या स्मरणार्थ हा सप्ताह साजरा केला जातो. महाराष्ट्रात या सप्ताहात विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात.


या समारोप समारंभात रिलायन्स जिओ व एमआयडीसी  फायर स्टेशन, हिंजवडी फेज १ येथील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. उपस्थित प्रमुख व्यक्तींमध्ये: श्री सुनील गोसावी – मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, महाराष्ट्र व गोवा सर्कल, श्री प्रसनजित भट्टाचार्य – राष्ट्रीय प्रमुख, सुविधा संचालन व गुणवत्ता, नेटवर्क टीमचे सदस्य – श्री जतिंदर वसिस्टा, श्री मुंजाल शाह, श्री राहुल राऊत,  पिचम्मेल वत्रिसेल्वम, श्री श्याम नाईक, श्री महेश भानारकर तसेच अग्निशमन अधिकारी – श्री सचिन नेरकर व श्री विलास शिने, तसेच एमआयडीसी  फायर स्टेशन, हिंजवडी फेज-१ची टीम सहभागी झाले


रिलायन्स जिओच्या या उपक्रमातून कर्मचाऱ्यांची सुरक्षा, दक्षता आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली.

Comments