हिंदू एकता आंदोलन यांच्यावतीने शिवजन्मोत्सव साजरा
कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क
हिंदू एकता आंदोलन कोल्हापूर यांच्या वतीने आज मंगळवार दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी १० वा. १० मिनिटांनी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. या नंतर संघटनेच्या जेष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते शिवमुर्तीचे पुजन करून शिवछत्रपतींच्या जयघोषात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला हिंदू एकता आंदोलन जिल्हा अध्यक्ष दीपक देसाई, चंद्रकांत बराले, अनिकेत पवार, हिंदूराव शेळके, आनंदराव कवडे, नंदकुमार आहीर, गणेश नारायणकर,संजय साडविलकर, बबनराव लगारे इत्यादी नवीन व जुने हिंदू एकता आंदोलन चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment