डॉ. जे. जे. मगदूम फार्मसी कॉलेज मध्ये रक्तदान शिबिर उत्साहात...
कोल्हापूर (जयसिंगपूर ) २२ सिटी न्यूज नेटवर्क
डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन माननीय डॉ. विजयराज मगदूम साहेब यांच्या वाढदिवासानिमित्त डॉ. जे. जे. मगदूम फार्मसी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आणि आदर्श ब्लड बँक सांगली, यांच्या सहयोगाने दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा तसेच प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. अपघातग्रस्त व्यक्ती, गर्भवती महिला, थैलेसिमिया आणि गंभीर आजारी लोकांचे जीव वाचवण्यात यावा या हेतूने हा शिबिर आयोजित करण्यात आला होता. रक्तदात्यांना सेंटरच्या वतीने अल्पोपाआहाराची सोय करण्यात आली होती.
या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनिल आडमुठे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शितलकुमार एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. सतीश किलजे, डॉ. प्रियंका गायकवाड तसेच आदर्श ब्लड बँकेचे डॉ. भास्कर कुलकर्णी, संजय टकले आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट सदैव समाजाच्या हितासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम राबवत राहील असा विश्वास संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनिल आडमुठे यांनी व्यक्त केला. या शिबिरास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शितलकुमार एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस-चेअर पर्सन अॅडो. डॉ. सोनाली मगदूम यांनी शुभेच्छा दिल्या. या रक्तदान शिबिराचे आयोजन कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रोग्राम ऑफिसर प्रा. प्रणिल तोरसकर, प्रा. सौरभ समडोळे, प्रा. सुमन होळीकरी व एनएसएस विद्यार्थी प्रतिनिधि कु. सात्विक चव्हाण यांनी केले.

Comments
Post a Comment