दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

रविवार, २७ एप्रिल २०२५








. चैत्र अमावस्या. ग्रीष्म ऋतू. उत्तरायण. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"आज वर्ज्य दिवस आहे" *दर्श अमावस्या* (चतुष्पाद,नाग करण शांती, नक्षत्र गंडांत)


चंद्र नक्षत्र - अश्विनी. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मेष.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) रवी चंद्र युती तर चंद्र केंद्र मंगळ योग आहेत. तुमच्याच राशीत चंद्र आहे मात्र ग्रहमान अनुकूल नाही. मोठे निर्णय आज घेऊ नका. घरात कटकटीं टाळा.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. प्रलोभने टाळा. कायदेशीर सल्ला घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. 

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा)चंद्र अनुकूल आहे. मात्र ग्रहमान फारसे अनुकूल नाही. बोलताना काळजी घ्या. कर्जे घेणे टाळा.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दशम चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. नोकरीत काही चांगले अनुभव येतील. आज चिडचिड होऊ शकते.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दूरचे प्रवास होतील. अडचणी दूर होतील. तीर्थयात्रा घडेल. अहंकार टाळा. काटेकोर नियोजन करा. 

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र ग्रहमान आहे. काहीशी प्रतिकुलता आहे. गरजूना मदत करा. अष्टम स्थानी रवी आहे. आरोग्यची काळजी घ्या.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आज महत्वाची कामे टाळा. मोठी गुंतवणुक नको. व्यावसायिक प्रतिस्पर्धी माघार घेतील. 

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक प्रगती होईल. अडथळे दूर होतील. मात्र प्रवासात अडथळे येतील. खर्च वाढेल.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र ग्रहमान आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी येणी वसूल होतील. वाहन अत्यंत जपून चालवा. क्रोध टाळा.

   

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मन उत्साही राहील. घरगुती कामाला प्राधान्य द्याल. नवनवीन कल्पना सुचतील. मात्र घाई नको.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यवसायिक यश लाभेल. मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. दुपार नंतर विश्रांती घ्या.

  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. आज महत्वाची कामे टाळणे हिताचे आहे. ज्येष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)


२७ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर मंगळाचा प्रभाव असल्याने तुम्ही धाडसी, आक्रमक, लढाऊ आणि तत्पर असतात. तुम्हाला पराभव पचवता येत नाही आणि नेहमी तुमचा विजय होतो. तुम्ही ध्येयपूर्ती झाल्याशिवाय थांबत नाहीत. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुम्ही त्यास तोंड देऊ शकतात. तुम्हाला खेळांची तसेच व्यायामाची आवड असते. तुमच्यात नैतिक धैर्य असते. अनेकदा तुमचा स्वतःच्या मनावर ताबा राहत नाही. तुम्ही मोठ्या मनाचे असतात आणि मित्रांशी प्रामाणिक राहतात. तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती आणि करारीपणा असतो. तुम्ही कष्टाळू असतात. मात्र गुप्त शत्रू पासून तुम्हाला त्रास होतो. अनेकदा खोट्या आरोपांचा तुम्हाला सामना करावा लागतो. तुम्ही भावनाप्रधान आणि लहरी स्वभावाचे आहात. मानसन्मान या बाबतच्या तुमच्या कल्पना जरा विलक्षण असतात आणि सन्मान न मिळाल्यास तुम्ही अस्वस्थ होतात. तुमचा स्वभाव अभ्यासू आहे. तुम्ही अहंकारी आणि हट्टी असल्याने तुमचा मित्र परिवार छोटा असतो. भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही स्वतःच्या मतांबद्दल आग्रही असतात. सखोल अभ्यास, तत्वज्ञानाचे आवड आणि बारीक विश्लेषण करण्याची वृत्ती ही तुमची वैशिष्ट्ये आहेत.


व्यवसाय:- पुढारी, कारखाना, डॉक्टर, केमिस्ट, इंजिनीयर, बांधकाम.


शुभ दिवस:- सोमवार, गुरुवार, शुक्रवार.


शुभ रंग:- पांढरा.


शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments