दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

सोमवार, ७ एप्रिल २०२५.







 शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर. वसंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०


"आज उत्तम दिवस आहे"    


नक्षत्र: आश्लेषा. आज जन्मलेल्या बाळाची राशी- कर्क. (धृती योग शांती करून घेणे) 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) रवी त्रिकोण चंद्र आणि चंद्र लाभ गुरू हे शुभ योग आहेत. शुक्र युती शनी आहे.  बरेच ग्रह व्यय स्थानात आहेत. साडेसाती चालू झालेली आहे. योग्य सल्ला घेतल्यास आणि काळजी पूर्वक पावले टाकल्यास प्रगती साध्य होईल.  कार्तिक आवक आणि खर्च आज सारखेच राहतील. प्रलोभने टाळा.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) ग्रहमान सर्वार्थाने प्रसन्न आहे. एकाचवेळी भौतिक सुखे आणि आध्यत्मिक प्रगती साध्य करणारा दिवस आहे. येणी वसूल होतील.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मनाची उभारी धरल्यास आज रखडलेली कामे पूर्ण होतील. आळस झटकून कमला लागावे लागेल. महिलांकडून लाभ होतील. 


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्याच राशीत चंद्रआहे. व्यवसायात वाढ होईल. अनुकूल गुरू भरघोस मदत करेन. नवनवीन पदार्थ चाखण्याचा दिवस आहे.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) व्यय स्थानी चंद्र आहे. आणि अष्टम स्थानी बरेचसे ग्रह बसलेले हेत. जपून पावले टाका.विचारपूर्वक निर्णय घ्या. एखादे काम न जमल्यास तसे स्पष्ट सांगा.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अकराव्या स्थानी चंद्र आहे. तुमचा चटपटीत स्वभाव आज कामास येईन. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. शनीचे पाठबळ लाभेल. मन अनादी राहील.



तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नोकरीच्या ठिकाणी विशेष उत्साह जाणवेल. कामाची गती वाढेल. शनी महाराज आर्थिक बाबतीत तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. 

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नव्या तंत्रज्ञानाला सामोरे जावे लागेल. खोळंबलेली कामे मार्गी लागतील. पत्नीचा सल्ला मोलचा ठरेल. 


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. अकस्मात धनलाभ होईल. आश्चर्यकारक घटना घडतील. खर्च देखील वाढेल.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सप्तम स्थानी चंद्र आहे. जोडीदाराची विशेष काळजी घ्याल. मनास संतोष लाभेल. ऐश्वर्य अनुभवाल.

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या सहाव्या घरात चंद्र आहे. धनलाभ करून देणारे ग्रहमान आहे. मूल्यवान खरेदी कराल. आरोग्याची मात्र काळजी घ्या.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मानसिक पातळीवर काहीसा अस्वस्थ करणारा दिवस आहे. मात्र तुमचा आत्मविश्वास दांडगा आहे. या जोरावर तुम्ही यशस्वी वाटचाल कराल. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)


७ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर नेपच्यून ग्रहाचा प्रभाव असल्याने तुम्ही स्वैर विचारांचे आहात. परंपरा, रूढी तुम्हाला आवडत नाहीत. तुमचे अनेक निर्णय हे अचानक बदलणारे किंवा अकल्पित असतात. तुमचे वागणे गूढ असते. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुम्ही त्यास तोंड देऊ शकतात. तुम्ही धाडसी आक्रमक आणि वेगवान काम करणारे आहात. तुमच्यात नाजूकपणा कमी असतो. आणि प्रणयरम्यता तुम्हाला फारशी आवडत नाही. दूरच्या देशांची तुम्हाला आवड असते आणि तुमचा परदेशाशी कायम संबंध येतो. मनातून तुम्ही सतत अस्वस्थ असतात. तुमच्याकडे तर्कबुद्धी चांगली असते. आणि त्याचा तुम्हाला व्यवहारात लाभ होतो. पैसे कसे कमवावे हे तुम्हाला चांगले समजते. तुम्ही जरी भावनाप्रधान असल्या तरी तुम्ही तुमच्या भावना उघड करत नाहीत. तुम्ही उच्च वर्तुळामध्ये वावरतात. आणि सामान्य लोकांमध्ये राहणे तुम्हाला आवडत नाही. दुर्बल लोकांना मदत करण्यात तुम्हाला एक सुप्त आनंद मिळतो. तुम्ही शीघ्रकोपी आहात मात्र तुमची मानसिक विचारधारा चांगली आहे. तुम्ही अभ्यासपूर्ण सल्ला देऊ शकतात. तुमच्या कृतीमध्ये आकाशाचा मुक्त पण असतं आणि कंटाळवाणे जीवन जगणे तुम्हाला आवडत नाही. तुम्ही बंडखोर वृत्तीच्या असतात आणि तुमचे आयुष्य चारचौघांपेक्षा वेगळी असते.


व्यवसाय:- आयात-निर्यात, खरेदी-विक्री, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल, वैद्यकीय, इलेक्ट्रॉनिक.


शुभ रंग:- पांढरा.


शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.


व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments