पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या राष्ट्रीय फिडे मानांकित शर्वरी कबनूरकरला उपविजेतेपद
पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या राष्ट्रीय फिडे मानांकित शर्वरी कबनूरकरला उपविजेतेपद
कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क
पुणे येथील अमनोरा हॉल हडपसर येथे २५ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान झालेल्या महाराष्ट्र बुद्धिबळ असो ग्रँड मास्टर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा "C" ग्रुप Below 1800 फिडे मानांकन या स्पर्धेत कोल्हापूरच्या राष्ट्रीय फिडे मानांकित खेळाडू शर्वरी कबनूरकर ला उपविजेतेपद मिळाले .
या क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत शर्वरीने ९ फेरीत ६.५ गुण संपादन करून हा विजय मिळवला. तिला ११००० रोख रक्कम आणि पारितोषिक मिळाले.
या स्पर्धेत तब्बल २१६ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंनी तसेच एकूण ३३५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
शर्वरी ही के आय टी कॉलेज सिव्हिल च्या प्रथम वर्षात शिकत असून तिला डॉ.मोहन वनरोट्टी संचालक के आय टी कॉलेज, डॉ.कुरेशी प्रथम वर्ष विभाग प्रमूख व शारीरिक शिक्षण संचालक प्रा.विजय रोकडे, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे माजी सचिव कृष्णात पाटील मार्गदर्शन लाभले.
.jpg)
Comments
Post a Comment