दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

 बुधवार, २३ एप्रिल २०२५.






 चैत्र कृष्ण दशमी/एकादशी. ग्रीष्म ऋतू. शके १९४६, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर. उत्तरायण. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०


"आज संध्याकाळी ५.०० नंतर चांगला दिवस आहे"  


चंद्रनक्षत्र - धनिष्ठा/ (दुपारी १२.०८ नंतर) शततारका. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ. (विष्टी करण शांती)


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) रवी लाभ चंद्र आहे. अत्यंत अनुकूल दिवस आहे. बौद्धिक क्षेत्रात चमक दिसेल. मनासारखी कामे होतील. प्रतिष्ठा वाढेल.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दशम चंद्र आहे. पराक्रम गाजवाल. स्वतःच्या मोठेपणासाठी खर्च कराल. कला क्षेत्रात यश मिळेल. 

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नवम स्थानी चंद्र आहे. काही सुखद अनुभव येतील. सन्मान मिळतील. सरकारी कामे मार्गी लागतील. शेतीतून लाभ होतील. 


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. वेळ खर्चात टाकणारी आहे. नोकरीत काही चांगले अनुभव येतील. वरिष्ठ खुश होतील.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. नोकरीत उत्तम प्रगती होईल. कामानिमित्त भ्रमंती होईल. गूढ विषयात आवड निर्माण होईल.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यावसायिक यश मिळेल. व्यापार वाढेल. काही शुभ घटना घडतील. प्रगती साध्य होईल.


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. धाडस कराल. आर्थिक लाभ होतील. शत्रूचा पराभव होईल. कोर्टात यश मिळेल.

   

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. बौद्धिक क्षेत्रात नावलौकिक वाढेल.

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम आर्थिक यश मिळेल. मेजवानी मिळेल. वक्तृत्व चमकेल. शब्दास मान मिळेल.  

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अध्यात्मिक प्रांतात उत्तम यश लाभेल. राजकीय क्षेत्रात वाटचाल कराल. गुंतवणुकीतून लाभ होतील. 

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्याच राशीत आज चंद्र आहे. अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. जोमाने प्रगती कराल. आत्मविश्वास वाढेल. मन आनंदी राहील. 

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र ग्रहमान आहे.  कामाची प्रगती होईल. शत्रू पराभूत होतील. प्रवासाचे नियोजन बदलावे लागेल.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments