कागलमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
कोल्हापूर ( कागल) २९ सिटी न्यूज नेटवर्क
शिवजयंतीनिमित्त कागल शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे संचालक मा. श्री. नविदसो मुश्रीफ आणि जिल्हा बँकेचे संचालक मा. श्री. प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या हस्ते करण्यात आले. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, संयुक्त कोष्टी गल्ली, स्टँड सर्कल (सागर गुरव), संयुक्त बाळासाहेब ठाकरे चौक, छत्रपती शिवाजी चौक आणि स्टँड सर्कल (शेठजी ग्रुप) या मंडळांनी सहभाग घेतला.
मिरवणुकीत साऊंड सिस्टिम, पालखी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी नविद मुश्रीफ म्हणाले, या मिरवणुकीत सहभागी होणे हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन, त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाने आम्ही सर्वजण एकत्र आलो. या उत्सवाच्या माध्यमातून युवा पिढीला शिवरायांच्या आदर्शांचा वारसा मिळावा, हीच आमची अपेक्षा आहे.
या प्रसंगी प्रविण काळबर, संजय चितारी, बाबासो नाईक, सुनिल माळी, संजय ठाणेकर, सागर गुरव, अर्जुन नाईक, सनी जकाते, राहुल चौगुले, संग्राम लाड, महेश गुरव तसेच सर्व मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment