शालेय १६ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत प्रणव मोरे अजिंक्य.

शालेय १६ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत प्रणव मोरे   अजिंक्य.



कोल्हापूर १४ सिटी न्यूज नेटवर्क 

 अनुज् चेस ॲकॅडमीच्यावतीने डॉ डी वाय पाटील विद्यानिकेतन स्कूल व इंजिनिअरींग काॅलेज साळोखेनगर येथे घेण्यात आलेल्या शालेय 16 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत प्रणव मोरे याने 5.5 गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले.

 


या स्पर्धेचे उद्घाटन विवेक कुलकर्णी,  डॉ कविता भानवसे, गडहिंग्लज यांचे हस्ते पटावरील चाल करून करण्यात आले. स्पर्धेमध्ये 6 फेऱ्या घेण्यात आल्या. प्रणव मोरे याने 5.5 गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. अरीन कुलकर्णी याने 5.5 (प्रोग्रेसिव) गुण मिळवून उपविजेतेपद पटकाविले. 

सहाव्या फेरीतील लढती   निकाल टॉपतीन बोर्ड वरील1 बोर्डवर प्रणव मोरे विरुद्ध बरोबरीत सामना झाला अरीन कुलकर्णी   2 बोर्डवर मानस महाडेश्वर विजय विरुद्ध ऋषिकेश निंबाळकर 3 बोर्डवर अथर्व बुट्टे विजय विरुद्ध शिवतेज पाटील


स्पर्धेतील इतर विजेते पुढील प्रमाणे 


तृतीय क्रमांक मानस महाडेश्वर 5 गुण 

चौथा क्रमांक अश्वत पंडित 

5 गुण (प्रोग्रेसिव्ह)

पाचवा क्रमांक अथर्व बुटे 5 गुण (प्रोग्रेसिव्ह) 


16 वर्षाखालील इतर विजेते 


8 वर्षाखालील

प्रथम क्रमांक राज देवलकर 3 गुण

द्वितीय क्रमांक सौमित्र जोशी 3 गुण


10 वर्षाखालील

प्रथम क्रमांक श्रीतेज वाली 5 गुण

द्वितीय क्रमांक

उत्तेजनार्थ बक्षिसे 


श्रीनय पालनकर

कृष्णा पाटील 

उत्कृष्ट शाळा म्हणून सुयोग इंग्लिश मीडियम स्कूल केर्ली , गडहिंग्लज चेस अकॅडमी यांना गौरवण्यात आले

स्पर्धेमध्ये 3 खेळाडू आंतरराष्ट्रीय मानांकन होते एकूण 64 स्पर्धकांनी सहभाग घेतला. 

स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री बाबूराव पाटील यांनी काम पाहिले. 

बक्षीस वितरण सौ सुषमा कदम प्रिन्सिपॉल सुयोग इंग्लिश माध्यम स्कूल केर्ली,  सौ तृप्ती कुलकर्णी, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव श्री कृष्णात पाटील तसेच राष्टीय खेळाडू अनुष्का पाटील आदी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. 

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मा. आम सतेज पाटील साहेब, मा. आम ऋतुराज पाटील साहेब,  व डॉ डी वाय पाटील इंजिनिअरींग काॅलेज साळोखेनगर चे प्रिंसीपल डॉ सुरेश माने यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शशिकांत कबनूरकर, अनुराग पाटील यांनी परिश्रम घेतले.



Comments