रविवारी (दि.१३ ) सोळा वर्षे खालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धा



रविवारी (दि.१३ ) सोळा वर्षे खालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धा 




 कोल्हापूर ८ सिटी न्यूज नेटवर्क 

येत्या रविवार  दि. १३ फेब्रुवारी रोजी एक दिवशीय सोळा वर्षे खालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली  आहे. अनुज चेस अॅकॅडमीच्या वतीने १६ वर्षांखालील मुला-मुलींची शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

रविवार, दि. १३ एप्रिल रोजी डॉ. डी. वाय. पाटील विद्यानिकेतन स्कूल व इंजिनिअरिंग कॉलेज साळोखेनगर येथे ही स्पर्धा होईल. 



स्पर्धा १६ वर्षांखालील (जन्म तारीख : १ जानेवारी २००९ किंवा त्यानंतर), १४ वर्षांखालील (१/१/२०११ किंवा त्यानंतर), १२ वर्षांखालील (१/१/२०१३ किंवा त्यानंतर), १० वर्षांखालील (१/१/२०१५ किंवा त्यानंतर), ८ वर्षांखालील (१/१/२०१७ किंवा त्यानंतर) अशा विविध गटांसाठी होणार आहे. दि. ८ पर्यंत सहभाग नोंदवावा. स्पर्धकांनी आधार कार्ड, स्वतःचा बुद्धिबळपट, चेस क्लॉक टिफीन घेऊन सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक कृष्णात पाटील, बाबुराव पाटील,  अनुष्का पाटील यांनी केले आहे.

अधिक माहिती साठी

 कृष्णात पाटील 9421104650 

बाबुराव पाटील 9422790495 

अनुष्का पाटील 9307295848 

संपर्क करावा.

Comments