गोवा येथील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकरला उपविजेतेपद
कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क
गोवा येथील रविंद्र हाल फरोदा मोरगाव येथे २६ एप्रिल ते२७ एप्रिल दरम्यान रॅपिड आणि ब्लिट स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
ब्लिट स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकरने खेळताना 7 फेरीत 6 गुण मिळवून उपविजेतेपद पटकावले त्याला रोख रक्कम रु3500 आणि पारितोषिक मिळाले
आय एम सुब्रया गुंडू पश्चिम बंगाल चा खेळाडू याने याने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले .
या स्पर्धेत 104 आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. एकूण 206 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होते.
त्याचबरोबर रॅपिड स्पर्धेत ऋषिकेश कबनूरकरने खेळताना 9 फेरीत 7 गुण मिळवत 10 वा क्रमांक मिळाला.त्याला रोख रक्कम रु2000 आणि पारितोषिक मिळाले.
या स्पर्धेत 156 आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. एकूण 333 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होते.
ऋषिकेश हा विवेकानंद महाविद्यालय विद्यार्थी आहे कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे माजी सचिव कृष्णात पाटील यांचे त्याला प्रशिक्षण लाभले.
.jpg)
Comments
Post a Comment