इचलकरंजी चेस अकॅडमी पुरस्कृत सात वर्षाखालील मुलामुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा रविवारी इचलकरंजी मध्ये

 इचलकरंजी चेस अकॅडमी पुरस्कृत सात वर्षाखालील  मुलामुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा रविवारी इचलकरंजी मध्ये




 कोल्हापूर २३ सिटी न्यूज नेटवर्क 

चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने इचलकरंजी चेस अकॅडमीने सात वर्षाखालील मुला मुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा रविवार, दि. 27 एप्रिल 2025 रोजी आयोजित केली आहे‌. कुमार विद्या मंदिर, एसटी स्टँड जवळ, तारदाळ येथे या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळाच्या नियमानुसार होणार आहेत. रविवारी सकाळी अकरा वाजता या स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल. या स्पर्धेमध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील 1/1/2018 ला किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलामुलींना भाग घेता येईल.

या निवड स्पर्धेतून दोन मुले व दोन मुलींची निवड 5 व 6 मे 2025 दरम्यान पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सात वर्षाखालील मुलामुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे़.

  मुले आणि मुली दोन्ही गटातील विजेत्यांना व उपविजेत्यांना अनुक्रमे रोख एक हजार व पाचशे रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

 याव्यतिरिक्त 8 मेडल्स उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.

निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना स्पर्धा खेळण्यासाठी संघटनेचा टी-शर्ट व राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा खेळून आल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रुपये दोनशे प्रवेश शुल्क ठेवले आहे. तरी इच्छुक बुद्धिबळपटूनी शनिवार दिनांक 26 एप्रिलला रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेश फी सह आपली नावे खालील व्यक्तीकडे नोंदवावीत.


  1) शैलेश होनकट्टी- 8484948748

 2) शंकर आडम -  90219 54464

3) कपिल ठोमके- 9834014338.

 4) मनीष मारुलकर - 9922965173

5) आरती मोदी - 8149740405

Comments