ग्राहकांच्या पसंतीच्या HP श्रेणीतील उंची एचपी गोल्ड चहा चे मान्यवरांच्या हस्ते अनावरण
कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क
शताब्दी वर्षाकडे वाटचाल करत असलेल्या स्टेशन रोडवरील दामोदर शिवराम आणि कंपनी ही चहाची पेढी. 1930 सालापासून चोखंदळ चहा शौकिनांची आवड जोपासत ही पिढी ग्राहक सेवेत तत्पर आहे .
या पिढीचा एचपी चहा शौकीनानं पुरेपूर पसंतीला उतरेल आहे आता त्याच बरोबर या श्रेणी तील थोडा उंची चहा एस पी गोल्ड चहा रु १००/- च्या पॅकेटमध्ये येत आहे, याचे अनावरण आज दामोदर शिवराम कंपनीचे सर्व पदाधिकारी आणि त्यांना नेहमी सपोर्ट करणारी डिस्ट्रीब्यूटर यांच्या समवेत सोहळा पार पडला
कंपनी बरोबर सदैव असणाऱ्या डिस्ट्रीब्यूटर यांचा सत्कार ही यावेळी करण्यात आला. या चहा व्यवसायाची सुरुवात केलेल्या दामोदर आणि शिवराम भावांनी देवरुख जिल्हा रत्नागिरी या कोकणातील गावी आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. अल्पावधीतच संगमेश्वर ,कोल्हापूर ,मुंबई ,पुणे, चिपळूण, कलकत्ता, गुवाहाटी , कराड ,सांगली ,निपाणी, गोवा अशा ठिकाणी आपला शाखा विस्तार केला. गद्रे कुटुंबीयांच्या चार पिढ्या या व्यवसायात कार्यरत असून आता पाचवी पिढी ही या व्यवसायात दाखल झाली आहे. येत्या 2030 साली दामोदर शिवराम आणि कंपनी या व्यवसायाची शताब्दी साजरी करेल.
या कार्यक्रमाला सुबोध गद्रे, संदीप गद्रे , राहुल गद्रे , तुषार गद्रे निलोत्पल गद्रे , शवर्ण गद्रे आणि कंपनीचे डिस्ट्रिबूटर, सेल्स स्टाफ आदी उपस्थित होते.



Comments
Post a Comment