अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीने केला समाजामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान
अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीने केला समाजामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान
भाजपच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरयांच्या जीवन प्रवासाचा अभ्यास करून कोल्हापूर जिल्ह्यातील ही अनेक माता-भगिनी सामाजिक कार्यामध्ये राजकीय जीवनामध्ये क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत या सर्व महिलांचा सन्मान करणे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कर्तव्यच असून अहिल्यादेवी होळकरांच्या राज्यकारभाराच्या अनुषंगाने अशा महिलांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या महीला जिल्हाध्यक्ष प्रा .सौ अनिता चौगुले यांनी केले .अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील होते .
अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोल्हापूर जिल्हा कार्यालयात समाजामध्ये उत्तुंग काम करणाऱ्या व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या यशस्वी महिलांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या
यावेळी बोलताना सौ चौगुले पुढे म्हणाल्या अहिल्यादेवींचे जीवन चरित्र हे महिलांना प्रेरणादायी आहेच पण अनेक संकटावर मात करत राज्यकारभार करत असताना येणाऱ्या संकटावर सामना करत सुनियोजित राज्यकारभार करणे हे अहिल्यादेवींच्या कडून शिकावे असे काम करणाऱ्या अहिल्यादेवींना वंदन करणे हे प्रत्येक भारतीयाची कर्तव्य आहे .
यावेळी प्रथम राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या कमल नामदेव अस्वले , जान्हवी सावर्डेकर (खेळाडू),राही सागर पाटील(खेळाडू), शारदा बापू जाधव(उद्योग),क्रांती अनिल बेनाड(कर सहाय्यक अधिकारी),विमल चंद्रकांत पाटील,सुरेखा अजय सोनार(उद्योजिका),परिणीती तानाजी मोरे(टॅलेंट सर्च),ब्रह्मकुमारी गीता बेहनजी(अध्यात्मिक),मयुरी आळवेकर(तृतीयपंथी समुदाय संघटन),निकिता शिंदे (पोलीस ) विश्रांती भगवान पाटील (कुस्ती )यांच्यासह अनेक महिलांचा सन्मान जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचे हस्ते करण्यात आला .
या कार्यक्रमास माजी जि. प.सदस्य मेघाराणी जाधव,कल्पना चौगले,रेखा नांगरे-पाटील,पूजा पाटील,योगिता संगाज,संगीता मोरे,ज्योत्स्ना पाटील,प्रभावती गायकवाड,विमल अतिग्रे, ऐश्वर्या पुजारी, सुजाता थडके,सुनीता घराळ,मोहिनी पाटील,प्रतिभा पडवळ,साधना माळी , शिवानी गजबर यांचे सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस सुशीला ताई पाटील यांनी केले तर आभार रेखा पाटील यांनी मानलें.

Comments
Post a Comment