दैनिक राशिभविष्य

 दैनिक  राशिभविष्य 

सोमवार, २६ मे २०२५






आणि शेवटी आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्य:-


. वैशाख अमावस्या. ग्रीष्म ऋतू, उत्तरायण. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


आज वर्ज्य दिवस आहे. *दर्श - भावुका अमावस्या, शनैश्वर जयंती, सोमवती अमावस्या.*


 चंद्रनक्षत्र - भरणी(शुक्र)/ (सकाळी ८.२४ नंतर) कृतिका (रवी)  आज जन्मलेल्या बाळाची राशी - मेष/ (दुपारी १.४१ नंतर) वृषभ. ( अतिगंड योग, शकुनी करण शांती)


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा बुध, शनी शी शुभ योग आहे. तुमच्याच राशीत चंद्र आहे. दिलेला शब्द पाळाल. भावंडांची मदत मिळेल. वक्तृत्व चमकेल. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा जपावी लागेल.  

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) 

व्यय स्थानी चंद्र आहे. काही सुखद अनुभव येतील. कामाच्या ठिकाणी सामाजिक वजन वाढेल. विनाकारण वाद टाळा. अति धाडस नको.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. सिद्ध व्यक्तीचे सान्निध्य लाभेल. आरोग्य सांभाळा. 


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) चांगला दिवस आहे. नोकरीत प्रगती होईल. नवीन संधी चालून येतील. कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. संध्याकाळ आनंदाची.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रगतीचा दिवस आहे. चांगली बातमी समजेल. प्रवास कार्यसाधक होतील.  मोठे निर्णय आज नकोत.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आर्थिक प्रगती बऱ्यापैकी होणार आहे. घरगुती समस्या सोडवाल. नैतिकता सोडू नका.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. प्रेमात यश लाभेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगती होईल. नेहमीची कामे चालू ठेवा.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. नफा वाढेल. विनाकारण वाद होऊ शकतात.  

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) महत्वाचे निर्णय आज नकोत. आर्थिक प्रगती ती ठाक होईल. शेअर्स/लॉटरी मधून लाभ होतील. 

  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) ग्रहमान अनुकूल आहे. कौटुंबिक कामात वेळ जाईल. स्वप्ने साकार होतील. सामाजिक कार्य कराल. मतभेद टाळा.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. उद्योग/ व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक कामे मार्गी लागतील. प्रतिष्ठा जपावी लागेल. 

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) भ्रमंती घडेल. कला क्षेत्रातून लाभ होतील. सहकार्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल. संवादातून मने जिंकली जातील.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  


२६ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर शनि, चंद्र आणि शुक्र ग्रहांचा प्रभाव आहे. नीटनेटकेपणा, स्वछता, गृहसजावाट, सौंदर्य प्रसाधने यांची तुम्हाला आवड आहे. मित्र, मैत्रिणी यांचा सहवास तुम्हाला प्रिय आहे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान असतात. घर आणि नातेवाईक तसेच प्रिय व्यक्तींचा तुम्हाला अधिक ओढा असतो. मोठ्या योजना पार पाडण्यात तुम्हाला आनंद मिळतो. प्रेमप्रकरणात 'न' पडणे चांगले. तुम्ही उत्स्फूर्त आणि उत्साही आहात. तुमचा स्वभाव चंचल आहे. तुम्ही अत्यंत विचारी, महत्वाकांक्षी आहात. संघटन करणे तुम्हाला चांगले जमते. ठराविक चाकोरीतून जाणे तुम्हाला आवडत नाही. तुमचा विरक्तीकडे कल असतो. जीवनात बऱ्याच वेळेला अति कष्टाने यश साध्य होते. छोट्या छोट्या कामांमध्ये अडथळे येतात. तुमचे विचार क्रियाशील असतात. तुम्ही विधायक कामे करतात. तुम्ही शांतताप्रिय आहात. सामाजिक कामाची तुम्हाला आवड आहे. गूढ विद्यांबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी आहे. तुम्ही संशोधक आणि धाडसी वृत्तीचे असून तुम्ही स्वाभिमानी आहात. स्वतःच्या कल्पनेतून तुम्हाला यश मिळते. तुम्ही भित्रेपणा टाळला पाहिजे. तुमच्यात अभ्यासाची खोली, शिस्त, गांभीर्य आणि कर्तव्याची जाणीव आहे. तुम्ही स्थिर वृत्तीचे आहात. कोणत्याही घटनेचा समतोल विचार करण्याची तुमची वृत्ती आहे. अनेकदा तुम्ही इतर लोकांपेक्षा अधिक धोरणीपणे निर्णय घेतात. तुम्ही कार्यमग्न असतात मात्र बुद्धिमत्ता वापरून कार्य करण्याकडे तुमचा अधिक कल असतो. तुम्हाला दुर्बल लोकांबद्दल सहानुभूती वाटते. तुमचे व्यक्तिमत्त्व अभ्यासू आणि प्रसन्न आहे. कोणत्याही गोष्टीचा तुम्ही उत्तम पणे नियोजन करू शकतात. तुम्ही न्यायप्रिय आणि कायदा प्रेमी आहात. तुमचे आर्थिक नियोजन उत्तम असते. कठीण काळाचे नियोजन कसे करावे हे तुम्हाला चांगल्याप्रकारे माहिती असते.


व्यवसाय:- गणित, भौतिक, रसायन, वैद्यकीय, शास्त्र, संशोधन, प्रयोगशाळा, बँकिंग, वकिली.


शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.


शुभ रत्ने:- इंद्रनील, काळा मोती, हिरा.


शुभ रंग:- राखाडी, गडद निळा, काळा, जांभळा.


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments