दैनिक राशिभविष्य
बुधवार, २८ मे २०२५.
आणि शेवटी आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये :-
ज्येष्ठ शुक्ल द्वितीया. ग्रीष्म ऋतू. शके १०४७, संवत २०८१, विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
"आज शुभ दिवस आहे"
नक्षत्र - मृग. वृषभ. (दुपारी १.३७ नंतर) आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन. (धृती योग शांती)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शुक्राशी लाभ योग, गुरुशी युती, शनि आणि नेपच्यूनशी केंद्र योग आहे. व्यवसाय वाढेल मात्र अधिक मेहनत करावी लागेल. शेजारांशी संबंध चांगले राहतील. महत्वाचे पत्रव्यवहार होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मनातील इच्छा पूर्ण होतील. आनंदी राहाल. स्पर्धत बक्षीस मिळेल. संपत्ती वाढेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आज दुपारी तुमच्याच राशीत चंद्र आहे. सुरुवात संथ सणार आहे. प्रिय व्यक्ती भेटतील. उत्साह वाढेल. भेटवस्तू मिळतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. मनासारखी कामे होतील. स्वप्ने साकार होतील. खर्चात वाढ होईल. धर्मिक कार्यात सहभागी व्हाल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल ब्राह्म आहे. अर्थकारण सुधारेल. कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. नोकरी/ व्यवसायात यश मिळेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक लाभ होतील. प्रवास घडतील सिद्धी प्राप्त होतील. प्रिय व्यक्ती कडून महत्वाचा संदेश येईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. आनंदी घटना घडतील. अचानक लाभ होतील. प्रवासाचे नियोजन बदलेल. उत्तरार्ध आनंदाचा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शत्रू त्रास कमी होईल. सरकारी कामाला गती मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. संपत्ती वाढेल. शेतीच्या कामत यश मिळेल. कोर्टात अनुकूलता.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यावसायिक लाभ होतील. धन संपत्ती वाढेल. संतती बाबत खुश खबर मिळेल. मित्र मंडळी भेटतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सामाजिक कामात भाग घ्याल. आनंदी आणि समाधानी वाटेल. संततीकडून आनंदाची बातमी समजेल. शेअर्स मध्ये यश मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामे पूर्ण करा. वेळ दवडू नका. भेटवस्तू मिळतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मित्र सुख मिळेल. वाहन सौख्याचा काळ आहे.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
२८ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र, बुध आणि रवी या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही स्वप्नाळू आहात. स्वभाव गंभीर असतो. सामाजिक कार्याशी तुमचा संबंध येतो. तुमच्या भावना तुम्हाला सहजपणे व्यक्त करता येत नाहीत. सामाजिक जीवनात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कौटुंबिक जीवनात अनपेक्षित बदल होतात. तुमचा जन्म चांगल्या आणि श्रीमंत घराण्यात होतो. तुम्ही संशोधक वृत्तीचे आहात. स्वभाव तापट असून भांडणाचे प्रसंग वरचेवर येत राहतात. प्रेमात उतावीळ होणे ठीक नाही. तुम्हाला अधिकार आणि प्रतिष्ठा मिळते. तुम्ही इतरांची परीक्षा चांगल्या प्रकारे करू शकतात. इतरांची माहिती तुम्ही गुप्त ठेवतात. त्यामुळे तुम्ही विश्वासू असतात. स्वभाव स्वतंत्र असतो. इतरांची लुडबुड चालत नाही. तुमचा सहवास उत्साहवर्धक असतो. तुम्ही व्यावहारिक सल्ला उत्तम प्रकारे देतात. तुम्हाला घराचा फारसा ओढा नसतो. तुम्ही अभ्यासू आहेत. जबाबदारीच्या जागा तुम्ही पैलू शकतात. तुमचा स्वभाव धडपडा असतो. तुम्हाला मोठेपणा आणि प्रतिष्ठा मनापासून आवडते. व्यवसाय किंवा नोकरीत तुम्हाला चांगले यश मिळते. तुम्ही तत्परतेने इतरांना मदत करतात. तुमची आवड नेहमी उच्च दर्जाची असते. तुम्ही स्वतंत्र विचाराचे आहात. तुमचा सतत बदल करण्याकडे ओढा असतो. तुम्ही एकाच गोष्टीत फार काळ रमत नाहीत. आपल्या आयुष्यात काहीतरी सनसनाटी असावा असं तुम्हाला नेहमी वाटत असतं. तुमच्या कामात सातत्य असतं आणि तुम्ही कार्यक्षम आहात. तसे तुम्ही प्रेमळ आहात. मित्रां बद्दल तुम्हाला सहानुभूती आणि आदर असतो. तुम्ही कलासक्त असतात. सौंदर्याचे भोक्ते असतात. अनेकदा सुगंधी द्रव्ये वापरणे तुम्हाला आवडते. तुम्हाला प्रवासाची देखील आवड आहे. तुम्ही इतरांना चांगला सल्ला देऊ शकतात. उच्चप्रतीचे कपडे, दागिने, वाहन, घर तुम्ही वापरत असतात. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही बुद्धिमान आहात आणि तुम्हाला गणित, शास्त्र आणि व्यापार यांची आवड आहे. तुम्ही झटपट काम करतात. तुमचा कामाचा वेग जास्त असतो. एखादे काम हाती घेतल्यावर तुम्ही त्याचे पूर्वनियोजन उत्तम प्रकारे करतात. तुम्हाला गूढ गोष्टींची आवड असते. तुम्ही प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे आहात. आळशीपणा तुम्हाला आवडत नाही. तुमची इच्छाशक्ती दांडगी असते. संशोधन करण्यात तुम्हाला रस असतो. तुमच्या बोलण्यात मोहक पणा आहे. लोकांना तुमचे बोलणे आवडते. तुम्ही तर्कशुद्ध विचार करतात आणि एखाद्या गोष्टीचा उत्तम विश्लेषण करू शकतात. हट्टीपणा आणि उतावीळपणा टाळला पाहिजे.
व्यवसाय:- तुम्ही एकाच व्यवसायात रमत नाहीत. व्यवसायात बदल करत असतात. पुस्तक विक्रेता, आयात-निर्यात, वृत्तपत्र व्यवसाय, इंटरनेट, इंटरियर डेकोरेटर, डिपार्टमेंटल स्टोअर, केमिस्ट, इंजिनियर.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शुक्रवार.
शुभ रंग:- सोनेरी,पिवळा, हिरवा.
शुभ रत्ने:- माणिक, पाचू, मोती. (रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली परीक्षण करून घ्यावे)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments
Post a Comment