दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

शुक्रवार, ३० मे २०२५


ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी. ग्रीष्म ऋतू. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


"आज सकाळी १०.०० पर्यंत चांगला दिवस आहे" 


चंद्र नक्षत्र - पुनर्वसू आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन/ (दुपारी ३.४२ नंतर) कर्क. (गंड योग, विष्टी करणं शांती)


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शनि, हर्षल, नेमच्यून शी शुभ योग, तर शुक्राशी केंद्र योआहे. व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. कामे पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात वजन वाढेल.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आध्यत्मिक उन्नतीसाठी चांगला कालावधी आहे. अनुकूल शनी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. व्यवसाय वाढेल.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. नोकरीतील अनुभवाचा फायदा होईल. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी खिअस नाकरात्मक भाव असला तरी संध्याकाळ आनंदाची आहे. 


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. सकाळी व्यय स्थानी चंद्र आहे. वादविवाद टाळा. खर्चात वाढ होऊ शकते. संध्याकाळ चांगली बातमी घेऊन येईल.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र ग्रहमान आहे. सकाळच्या सत्रात अर्थप्राप्ती होईल. कामे पूर्ण करा. गरजूना मदत करा. संध्याकाळ खर्चात टाकणारी असू शकते.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तुमच्या कडून अपेक्षा वाढतील. मोठी गुंतवणुक आज टाळा. व्यावसायिक प्रतिस्पर्धी शरण येतील. अचानक लाभ होतील.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) स्थावर संपत्ती बाबत काही मार्ग निघू शकतात. व्यावसायिक जागेत बदल संभवतो. विजयश्री मिळेल. सुखद धक्का बसेल.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र ग्रहमान आहे. काही सुखद समाचार मिळतील. अनैतिक कामे टाळा. विरोधक सापशेक माघार घेतील. 


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मन उत्साही राहील. संततीकडून चांगली बातमी समजेल. संध्याकाळ काहीशी चिंता वाढवणारी असू शकते.

   

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र ग्रहमान असले तरी मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. व्यवसाय वाढेल. अर्थकारण मजबूत होईल. 


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. दिवसभरात महत्वाची कामे पूर्ण करा. आत्मविश्वास वाढेल. दिवस आनंदात व्यतीत कराल. 

  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) ग्रहमान अनुकूल आहे. व्यापारात लाभ होतील. मात्र नियोजन बदलेल. छोटे प्रवास घडतील. मौल्यवान खरेदी होईल.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)


३० मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये


     तुमच्यावर बुध, गुरु आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही शांत आणि प्रामाणिक आहात. तुम्ही कृतिशील असलात तरी अवस्थ असतात. तुंचायत आत्मविश्वास, अभिमान आहे. सामाजिक कार्याची आवड आहे. दुर्बलना मदत करतात. समाजप्रिय असतात. नाटक, सिनेमा, क्लब, प्रवास यांची आवड असते. कला आणि संगीत यात तुम्हाला रुची असते. गृहसजावट चांगल्या प्रकारे करतात. तुम्ही प्रेमळ आहात. खास करून मुलांबद्दल विशेष प्रेम असते. आयुष्यात काहीसा उशिरा तुम्हाला मान मरातब मिळतो. तुमचा उत्साह दांडगा असतो आणि तुम्हाला प्रवासाची आवड असते. तुमच्या भोवती एकप्रकारचे वलय असते. लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. वारसा हक्काने तुम्हाला संपत्ती मिळते. तुम्ही लोकप्रिय असतात. तुम्हाला अध्यत्मिक प्रगतीची ओढ असते. तुम्ही इतरांना योग्य सल्ला देतात. सुखासीन जीवनाकडे तुमचा ओढा असतो. इतरांचे बारीक सारीक दोष तुम्ही सहज काढू शकतात. तुम्हाला सहजगत्या अधिकार आणि प्रतिष्ठा मिळते. तुम्हाला उत्तम प्रतिष्ठा लाभते. तुम्ही ज्ञानी असतात आणि त्याबाबत तुमचा आत्मविश्वास दांडगा असतो. धर्माची तुम्ही चिकित्सा करतात मात्र तुम्ही नास्तिक नसतात. तुम्ही महत्वाकांशी आहात. शुद्ध प्रेम तुम्हाला आवडते. तुम्ही कायदा प्रेमी आहात. इतरांच्या भल्यासाठी तुम्ही मेहनत करतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुम्ही व्यवस्थित, काटेकोर आणि टापटीप आहात. तुमच्या कृतीमधून तुमचे उत्तम नियोजन दिसून येते. मैदानी खेळांची किंवा घरगुती खेळांचे तुम्हाला आवड असते. तुम्ही एखाद्या प्रकल्पाचे नियोजन उत्तम पणे करू शकतात. तुम्हाला गूढ विद्यांची आवड आहे. धर्म आणि तत्वज्ञान तुमच्या विशेष आवडीचे आहेत. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. प्रेम प्रकरणात तुम्ही संयमी असतात. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहात. वयाच्या ३० व्या वर्षी भाग्योदय होतो.


व्यवसाय:- राजकारण, न्यायाधीश, सचिव, सामाजिक कार्यकर्ता, डॉक्टर, प्राध्यापक.


शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.


शुभ रंग:- पिवळा, जांभळा हिरवा.,


शुभ रत्न:- पुष्कराज, अमेथिस्ट, लसण्या. (रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली परीक्षण करून घेणे)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments