कोल्हापूरला महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण स्थापन करावं, या मागणीसाठी उजळाईवाडीचे राजू माने १ जूनपासून दसरा चौकात करणार सलग ९९ तास उपोषण
कोल्हापूरला महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण स्थापन करावं, या मागणीसाठी उजळाईवाडीचे राजू माने १ जूनपासून दसरा चौकात करणार सलग ९९ तास उपोषण
![]() |
| सामाजिक कार्यकर्ते राजू उर्फ सुनील माने |
कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्यासाठी अनेक तांत्रिक मुद्दे समजून घेण्याची गरज आहे. मुळात कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्र्राधिकरणाची स्थापना करताना अनेक त्रुटी राहील्या आहेत. त्यामुळे हद्दवाढ करता येत नाही. त्यासाठी पूर्ण जिल्हयाचा समावेश असलेले कोल्हापूर महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण म्हणजेच केएमआरडीए स्थापन करण्याची गरज आहे. त्यासाठी कोल्हापुरकर नागरिकांनी संघटीतरित्या शासनाकडे मागणी करावी. याबाबत जनजागृती करण्यासाठी १ ते ५ जून या कालावधीत सलग ९९ तास दसरा चौकातील राजर्षि शाहूंच्या पुतळयासमोर आपण उपोषण करणार आहे. अशी माहिती उजळाईवाडीचे राजू माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापुरची हद्दवाढ सध्याच्या नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणामार्फत होवू शकत नाही. असे सांगत राजू माने यांनी हद्दवाढ समर्थक आणि विरोधक या दोघांनाही यातील तांत्रिक बाजू समजावून घेण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. १९४२ साली कोल्हापूरची पहिल्यांदा हद्दवाढ झाली. त्यावेळी ८ गावे हद्दवाढीमध्ये घेण्याचा प्रस्ताव होता. मात्र चारच गावे घेण्यात आली. आता २०२५ साली शहराच्या हद्दवाढीबाबत अजुनही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन नियोजनबध्द पावले उचलताना दिसत नाहीत. कोल्हापूर शहराला मेट्रो सिटीची आवश्यकता आहे. कोल्हापूर शहराची १० लाख लोकसंख्या आणि २० किलोमीटरचा परिघ असेल, त्याचवेळी महापालिका क वर्गातून ब वर्गात येईल आणि केंद्र तसेच राज्य शासनाचा भरघोस निधी कोल्हापूर शहराला मिळून त्यातून सुनियोजित विकास करता येईल. त्यासाठी कोल्हापूर महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरणाची स्थापना करण्याची मागणी कोल्हापुरकरांनी शासनाकडे केली पाहीजे. याबाबत जनजागृती करण्यासाठी १ जूनला दुपारी २ वाजता दसरा चौकातील राजर्षि शाहू पुतळयाजवळ उपोषणाला बसणार असून, ५ जूनला सायंकाळी साडेचार वाजता जिल्हाधिकार्यांना निवेदन देवून उपोषणाची सांगता करणार असल्याचे राजू माने यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.

Comments
Post a Comment