दैनिक राशिभविष्य
मंगळवार, २७ मे २०२५
आणि शेवटी आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये:-
मंगळवार, २७ मे २०२५. वैशाख/ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा. ग्रीष्म ऋतू. विश्ववसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
चंद्र नक्षत्र - रोहिणी/ आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ. (करण शांती)
"आज क्षय तिथी आहे. *करिदिन*
मेष:- चंद्राचा मंगळाशी शुभयोग् आहे. कौटुंबिक सुख लाभेल. धन धान्य वाढेल. कर्जे घेऊ नका. अधिकार वाढेल.
वृषभ:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. सामाजिक कार्य कराल. आत्मविश्वास वाढेल. अहंकार टाळा.
मिथुन:- संमिश्र ग्रहमान आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. आध्यत्मिक प्रगतीसाठी उत्तम कालावधी आहे. दानधर्म कराल. सरकारी नियमांचा फटका बसू शकतो.
कर्क:- लाभ स्थानी चंद्र आहे. नवीन खरेदी होईल. अचानक लाभ होतील. मन आनंदी राहील. स्वप्ने साकार होतील.
सिंह:- आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. ग्रहमान अनुकूल आहे. नोकरीत चांगले अनुभव येतील.
कन्या:- मन पवित्र विचारांनी भारून जाईल. पूर्वजांची पुण्याई अनुभवास येईल. प्रवास घडतील. आरोग्य सांभाळावे लागेल.
तुळ:- अष्टम स्थानी चंद्र आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटेल. संपत्ती वाढेल. मात्र नैतिक मार्ग सोडू नये.
वृश्चिक:- उत्तम व्यावसायिक यश लाभेल. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. पत्नीची मोलाची साथ मिळेल. प्रिय व्यक्ती भेटतील.
धनु:- अनुकूल ग्रहमान आहे. कामात सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभ होतील. भरभराट होईल.
मकर:- प्रगती साधणारा दिवस आहे. व्यवसाय वृद्धी होईल. उत्साह वाढेल. संततीकडून चांगली बातमी समजेल.
कुंभ:- चतुर्थ स्थानी रवी चंद्र युती आहे. घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याची उबळ येऊ शकते. सांभाळून पावले टाका. घरगुती कामे आज पूर्ण होतील. संतती कडून सहकार्य मिळेल.
मीन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. छोटे प्रवास घडतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
२७ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्टे
तुमच्यावर मंगळ, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्यात जबरदस्त आत्मविश्वास आहे. तुमचे व्यक्तिमत्व विरोधाभासी आहे. दुरबल लोकांना मदत करणे तुम्हाला आवडते. भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण असते मात्र तुम्ही मोह टाळणे उत्तम. तुम्ही भावनाप्रधान आणि लहरी असू शकतात. त्यामुळे तुमचा स्वभाव चटकन इतरांना समजत नाही. दुराग्रह टाळला पाहिजे. किरकोळ बाबींवरून तुम्ही अस्वस्थ होतात. न्याय प्रिय आहात. तुम्ही सभ्य आणि मोठा मनाचे आहात. मित्रांशी तुम्ही प्रामाणिक असतात. कोणत्याही जबाबदारी घेतल्यासतुम्हाला त्यात यश मिळते. प्रकृती सुदृढ असते. मात्र विकारांवर ताबा ठेवला पाहिजे. वक्तृत्व चांगले असते. स्वभाव हरहुन्नरी आणि स्वतंत्र असतो. तुम्ही आक्रमक स्वभावाचे, धाडसी, कामात तत्पर आणि प्रतिकार करण्यास सक्षम आहात. थोडक्यात म्हणजे तुम्ही लढाउ वृत्तीच्या आहात. कधी कधी तुम्ही स्वतः होऊनच एखादे भांडण उकरून काढतात. तुम्ही महत्वाकांक्षी आहात आणि एखाद्या विषयाचा पूर्ण अभ्यास करणे तुम्हाला आवडते. शक्यतो तुम्ही इतरांचा सल्ला मानत नाहीत. मनात घेतलेले काम तुम्ही पूर्ण करतातच. कधीकधी तुमच्यात उतावळेपणा असू शकतो. तुमच्याकडे उत्तम वक्तृत्व आहे. शिकवण्यात तुम्हाला खरा आनंद मिळतो. मोठेपणा, प्रतिष्ठान, मान सन्मान याला तुम्ही प्राधान्य देतात. वारसा हक्काने तुम्हाला संपत्ती मिळते. स्मरणशक्ती चांगली असते. सरकारी पातळीवर तुम्हाला मानसन्मान मिळतात. स्वतःची चूक मान्य करणे तुम्हाला फारसे पसंत नसते. शक्यतो तुम्ही इतरांवर टीका करणे टाळावे आणि नम्र राहावे यात तुमचा फायदा आहे. तुम्ही शक्तिवान असतात. तुम्हाला मैदानी खेळांची आवड आहे. तुम्ही काहीसे शीघ्रकोपी असले तरी अनेकदा स्वतःच्या मनावर ताबा ठेवू शकतात. तुमच्या विचारांमध्ये ठामपणा आहे. तुम्हाला प्राणी आणि निसर्ग यांची आवड आहे. तुम्ही मोठ्या अधिकाराच्या जागा सांभाळू शकतात.
तुम्ही अहंकार टाळला पाहिजे.
व्यवसाय:- बेकरी, हॉटेल, दागिने विक्री, आर्किटेक्ट, गृहसजावट, मिल्ट्री, पोलीस, इंजिनीयर, लोखंड. बांधकाम क्षेत्र.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- तांबडा, पांढरा, पिवळा.
शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडलीचा अभ्यास करावा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments
Post a Comment