नि:स्वार्थी कार्यकर्त्यालाच स्थानिक स्वराज्य निवडणुकीत उमेदवारी मिळणार : हिंदू एकता आंदोलन
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांची भुमिका या विषयावर नुकतीच हिंदू एकता आंदोलन पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची हिंदू एकता आंदोलन कार्यालय मिरजकर तिकटी येथे बैठक पार पडली.
या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आपल्या संघटनेची भूमिका काय असावी यांवर प्राथमिक चर्चा झाली.
या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निस्वार्थी पणाने,धोका पत्करून कार्य करीत असतात , हिंदू समाजावर होणार्या आघातांविरोधात वेळोवेळी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होत असतात अशा कार्यकर्त्यांना उमेदवार म्हणून संधी दिली पाहिजे आणि कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्यात हिंदुत्ववादी नेतृत्व तयार केले पाहिजे असा विचार मांडण्यात आला.
या बैठकीत जिल्ह्यातील व कोल्हापूर शहरातील प्रमुख हिंदुत्ववादी संघटना यांच्याशी चर्चा करून या संकल्पनेत सहभागी करून घेतले जावे असा ठराव करण्यात आला . तसेच जिल्ह्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची मते मागववुन पुढील दिशा ठरवली जाईल.
या विषयी हिंदू एकता आंदोलन प्रांताचे प्रमुख पदाधिकारी यांना सर्व माहिती देण्यात येईल त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे.
लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख हिंदुत्ववादी संघटना यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येतील.
या बैठकीला हिंदू एकता आंदोलन जिल्हा अध्यक्ष श्री दिपक देसाई , महानगर जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रकांत बराले,उप शहरप्रमुख श्री अनिकेत पवार, गणेश नारायणकर, हिंदूराव शेळके, विलास मोहीते, आनंदराव कवडे, संजय साडविलकर, उत्तम भोसले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment