मदर्स डे निमित्त आयोजित फोटोग्राफी स्पर्धेत अजिंक्य विजयकुमार खराडे विजेता

 मदर्स डे निमित्त आयोजित फोटोग्राफी स्पर्धेत अजिंक्य विजयकुमार खराडे विजेता



कोल्हापूर, दि .२७ सिटी न्यूज नेटवर्क 

भोपाळ येथील हर हेल्थ हॉस्पिटलच्या वतीने मदर्स डे निमित्त आयोजित फोटोग्राफी स्पर्धेत पाचगाव येथील अजिंक्य विजयकुमार खराडे विजेता ठरला.

देशभरातून ३०० फोटोग्राफरनी भाग घेतलेल्या या स्पर्धेतील १७५ फोटो प्रदर्शनासाठी निवडले होते.

अजिंक्य चा विजेता फोटो 



पाचगाव येथील पिक्सल फोटो स्टुडिओचे अजिंक्य विजयकुमार खराडे यांचा यामध्ये पाचवा क्रमांक आला. रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप आहे.

Comments