कोल्हापूर हायकर्सची पवित्र जल संकलन मोहीम - २०२५
कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड', मार्फत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही किल्ले रायगडावर भव्यदिव्य असा ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा ६ जून रोजी साजरा करण्यात येणार आहे संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासात शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ऐतिहासिक दृष्टीन महत्त्व आहे. म्हणून या राज्याभिषेक सोहळ्यासाठी स्वराज्यरक्षिका, मोगलमर्दिनी, महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्मोत्सवानिमित्त महाराणी ताराराणीच्या जन्मठिकाणापासून ते स्वराज्यरक्षणा करिता ज्या ज्या ठिकाणांच महत्त्व आहे अशा ठिकाणाहून पवित्र जलसंकलन करण्यात आले आहे
त्यात
१.तळबीडचा वसंतगड,
२.स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड, (जिथे महाराणी ताराराणींचे बालपण गेले व लग्न झालेले ठिकाण),
३.साताऱ्याचा अजिंक्यतारा,
४.छत्रपती संभाजीराजांच्या नंतर स्वराज्य संकटात असताना ज्या किल्ल्याच्या मदतीने जिंजीला जाणे सोपे झाले असा दुर्गम खेळणा उर्फ विशाळगड,
५.छत्रपती राजाराम महाराजांना आश्रय देणारी स्वराज्याची दुसरी राजधानी जिंजी,
६.छत्रपती राजाराम महाराजांचे समाधीस्थळ किल्ले सिंहगड,
७.करवीर संस्थानची राजधानी किल्ले पन्हाळा
८.समाधीस्थळ संगम माऊली,
दरवर्षीप्रमाणे हिमालयातील एक पवित्र ठिकाणावरील जल संकलित केले जाते यावर्षी ते ठिकाण म्हणजे.
९.हिमालयातील कुमाऊँ पर्वतरांगेतील पवित्र काली नदी.
दिल्लीच्या मोगल सल्तनतीशी - स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराजांच्या नंतर एका रणरागिनीनी दिलेली झुंज जगाच्या इतिहासात नोंद सुवर्णाक्षरांनी झाली आहे अशा रणरागिणी स्वराज्यरक्षिका, मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी यांच्या ३५० व्या जन्मोत्सवानिमित्त वरील पवित्र ठिकाणावरून कोल्हापूर हायकर्सच्या रणरागिन्यांनी संकलित केलेल्या पवित्र जलाने शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे.
यामध्ये श्रावणी पाटील, आरती संकपाळ, देविकाराणी पाटील, चंद्रलेखा सावंत, गौतमी भाले, तृप्ती पवार श्रेया शिंदे, सोनाली ससे, स्नेहा जाधव या कोल्हापूर हायकर्सच्या महिला सदस्यांचा समावेश होता त्यांना जयाजी मोहिते, सागर पाटील, विजय ससे, ओम कोगनोळे, रणसिंग जाधव, अविनाश भाले, इंद्रजीत मोरे यांचे सहकार्य लाभले.
कोल्हापूर हायकर्स कडून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हिमालयातील कुमाऊँ पर्वतरांगेतील पवित्र काली नदी मधील केलेले जल संकलन उत्तराखंड राज्यातील पिथोरागड जिल्ह्यात, हिमालयातील कुमाऊँ पर्वतरांगेत वसलेले कालापाणी पोस्ट हे एक पवित्र, ऐतिहासिक व सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. येथेच ओम पर्वताच्या पायथ्याशी असलेले काली नदीचे उगमस्थान आहे, जे समुद्रसपाटीपासून सुमारे १२,००० फूट उंचीवर आहे.काली नदी ही भारत आणि नेपाळच्या सीमेवर वाहणारी एक प्रमुख नदी असून, असे म्हटले जाते की सहा महिने तिचा प्रभाव नेपाळच्या दिशेने तर सहा महिने भारताच्या दिशेने अधिक असतो. ही नदी दोन्ही देशांना नैसर्गिक सीमेने विभाजित करते. या ठिकाणी काली माता मंदिर आहे, जे भारतीय सैनिक आणि स्थानिक नागरिकांच श्रद्धास्थान आहे. याच परिसरात वीर मराठा बटालियनची तुकडी कायमस्वरूपी तैनात असून, अहोरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करत आहे.
मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी महाराणींच्या रणरागिनीनी या पवित्र हिमालयातील स्थळी जाऊन, काली नदीच्या उगमस्थानाहून शिवराज्याभिषेकासाठी जल संकलन केलं आहे. या पवित्र भूमीतून — जिथे श्रद्धा, राष्ट्ररक्षण आणि इतिहास एकत्र नांदतो — अशा ठिकाणाहून शिवराज्याभिषेकासाठी पवित्र जल संकलन करण्यात आल आहे. ही केवळ एक जलयात्रा नसून, आपल्या परंपरेचा, शौर्याचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक जाज्वल्य साक्षात्कार आहे — शिवस्मरण, पराक्रम आणि भक्ती यांचा एक अमर संगम.
कोल्हापूर हायकर्सची पवित्र जल संकलन मोहीम - २०२५आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती दुर्गराज रायगड अध्यक्ष संदीप खांडेकर, कार्याध्यक्ष सुखदेव गिरी, कार्याध्यक्ष हेमंत साळुंखे तसेच कोल्हापूर हायकर्सचे चे सदस्य, श्रावणी पाटील, आरती संकपाळ, स्नेहा जाधव, श्रेया शिंदे, गौतमी भाले, सोनाली ससे, तृप्ती पवार, राजेंद्र भस्मे, इंद्रजीत मोरे, ओम कोगनुळे, रणसिंग जाधव, सागर पाटील, विजय ससे उपस्थित होते

Comments
Post a Comment