केरळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या वेंकटेश खाडे- पाटील चा तृतीय क्रमांक

 केरळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या वेंकटेश खाडे-पाटील चा तृतीय क्रमांक



कोल्हापूर ०४ सिटी न्यूज नेटवर्क 

 केरळ येथील कोट्टायम येथे १ मे ते ३ मे दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय १६५० खालील बी गट बुद्धिबळ स्पर्धेत वेंकटेश खाडे पाटील ९ फेरीत ६ गुण मिळवत , १९ वर्षाखालील मुलांच्या गटात तृतीय क्रमांक पटकावला. 

त्याला रोख रक्कम रु.५००० रुपये तसेच पारितोषिक मिळाले. तब्बल १० लाख रुपये रोख रक्कम असलेली ही मोठी स्पर्धा होती.

या स्पर्धेत तब्बल ४२६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. 

वेंकटेश ने या वर्षी सेवेंथ डेज अँडवाटेज सेकंडरी स्कुल शिवाजी पार्क कोल्हापूर मधुन 10वीची परिक्षा दिली आहे. त्याला प्राचार्य थालूरी मोहन राय , यांचे क्रीडा प्रशिक्षक रुपेश शिंदे , कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले

Comments