दैनिक राशिभविष्य
शनिवार, ३१ मे २०२५
आणि शेवटी आज जन्मलेल्या व आज वाढदिवस असणाऱ्या व्यक्तींची वैशिष्टये:-
शनिवार, ३१ मे २०२५. ज्येष्ठ शुक्ल पंचमी. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
"आज चांगला दिवस आहे"
नक्षत्र: पुष्य/आश्लेषा. आज जन्मलेल्या बाळाची राशी- कर्क.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
![]() |
| मा ऋतुराज पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज रवीशी शुभ योग आहे. अनुकूल दिवस आहे. तुमची कीर्ती दिगंत पसरेल. सामाजिक कार्यातून यश मिळेल. मान - सन्मान होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) अनुकूल ग्रहमान आहे. तृतीय स्थानी चंद्र आहे. सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ उत्तम होतील. व्यवसाय वाढेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम ग्रहमान आहे. स्वप्ने साकार होतील. आर्थिक तरतूद होईल. कुटुंबातून सहकार्य आणि मान मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्याच राशीत चंद्र आहे.आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात भरघोस वाढ होईल. प्रगतीची नवी दालने खुली होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) व्यय स्थानी चंद्र आहे. मात्र काळजीचे कारण नाही. काही सुखद घटना घडतील.योग्य कारणासाठी खर्च होईल. लाभ होतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे. लाभ स्थानी चंद्र आहे. अत्यंत चांगले अनुभव येतील. उद्योग/व्यवसायात प्रगती होईल. मान सन्मान मिळतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नोकरीत सुखद अनुभव येतील. आधुनिक तंत्रज्ञान शिकून त्याचा नोकरीत वापर कराल. कायदे पालन करा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक बाबतीत आज भाग्य उजळेल. व्यापारी कामे पूर्ण होतील. नवीन संधी मिळतील. कोर्टात यश मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. काही नाती नव्याने निर्माण होतील. व्यावसायिक कामाला प्राधान्य द्यावे लागेल. समाजकार्य कराल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शत्रू कमजोर होईल. आरोग्य सुधारेल. कोर्टात यश मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. सामाजिक करीत अग्रेसर रहाल. धन संपत्ती वाढेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. विविध प्रश्न मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. गुंतवणूक कराल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
३१ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर हर्षल, बुध आणि शुक्र यांचा प्रभाव आहे. तुमच्यात महत्वाकांक्षा आणि अभिमान आहे. सामाजिक कार्याची तुम्हाला आवड असते. तुम्ही बुद्धिमान असून उंची चांगली असते. इतरांना मदत करणे तुम्हाला आवडते. मोठ्या अधिकाराच्या जागा तुम्हाला मिळतात. वयाच्या ४० नंतर भाग्योदय होतो. मात्र आपल्याला लवकर यश आणि प्रसिद्धी मिळावी असे तुम्हाला वाटते. तुमचा व्यावहारिक दृष्टीकोन असतो आणि इच्छाशक्ती जबरदस्त असते. तुम्ही सतत कार्यमग्न असतात. वरिष्ठ तुमच्यावर खुश असतात. तुम्ही संभाषण चतुर आहात. शिकवणे, भाषण देणे, लेखन यात तुम्ही तरबेज असतात. तुम्ही काहीसे उतावीळ असतात. तुमची स्मरणशक्ती चांगली असते. तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची जाणीव झाल्यास अशक्य असे काही नाही. तुम्हाला बुद्धिमान आणि चतुर लोकांमध्ये राहणे आवडते. तुमची शरीरयष्टी चांगली आहे. डोळे सुंदर आहेत. स्वभावअस्थिर असतो. अनेकदा तुम्ही अनाकलनीय निर्णय घेतात. भिन्न लिंगी व्यक्तीकडून तुम्हाला लाभ मिळतात. स्वतःच्या व्यवसायात यश मिळते. मित्र परिवार मर्यादित असतो. वादविवाद करायला तुम्ही तयार असतात. सुरुवातीला जीवनात संघर्षं असला तरी नंतर उत्तम यश मिळते. तुमचे व्यक्तिमत्व विरोधाभासी असते. तुमच्या जीवनात बरेच चढ-उतार येतात. अनेकदा तुमच्या आयुष्यात अनपेक्षित घटना घडत असतात. तुम्हाला कधीकधी काही विलक्षण अनुभव येतात. तुमच्यात जबरदस्त उत्साह आणि जोम आहे. कितीही विरुद्ध परिस्थिती असली किंवा अडचणी असल्या तरी तुम्ही त्यास समर्थपणे तोंड देऊ शकतात. तुम्ही व्यापारी वृत्तीचे आहात आणि तुमच्या कामाचा वेग प्रचंड आहे. शास्त्राची तुम्हाला आवड आहे. हातात घेतलेले काम शक्यतो वेळेच्या आधी पूर्ण करण्याकडे तुमचा कल असतो. जुन्या रूढी आणि परंपरा तुम्हाला फारशा आवडत नाहीत. तुम्हाला खोटेपणाची चीड आहे. नवनवीन गोष्टी करणे आणि प्रवास करणे याची तुम्हाला आवड आहे. तुमच्या अवतीभवती मित्र मंडळ यांची गर्दी असते. मात्र तुम्हाला सतत बदल हवा असतो. त्यामुळे तुमचे मित्र मंडळ नेहमी बदलत असते. डोकं शांत ठेवून काम केल्यास तुम्हाला जीवनात उत्तम यश मिळू शकते. तुम्ही आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. तुमच्या स्वभावात ठामपणा आहे मात्र तुम्ही अहंकार टाळला पाहिजे.
व्यवसाय:- जाहिरात माध्यम, इलेक्ट्रॉनिक्स, इंटेरियर डेकोरेशन. बँकिंग, व्यापार, आयात निर्यात, भौतिक शास्त्र, वैद्यकीय शास्त्र, वजन आणि मापे नियंत्रण.
शुभ दिवस:- सोमवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ रंग:- निळा, पिवळा, नारंगी, राखाडी.
शुभ रत्न:- पाचू, पुष्कराज, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

.jpg)
Comments
Post a Comment