दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

गुरुवार, २९ मे २०२५


. ज्येष्ठ शुक्ल तृतीया. ग्रीष्म ऋतू. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.०० (भारतीय प्रमाण वेळेनुसार)


"आज उत्तम दिवस आहे" 


चंद्र नक्षत्र - आर्द्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन. (शूल योग शांती)


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या  फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) मनासारखा दिवस व्यतीत होईल. व्यवसाय वाढेल. मौल्यवान खरेदी होईल. चैनीवर पैसे खर्च कराल. 


वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रणय रम्य दिवस आहे. आवडत्या व्यक्तीची भेट होईल. संपत्ती वाढेल. अचानक लाभ होतील.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आर्थिक आवक चांगली होईल. मान सन्मान मिळतील. प्रवास घडतील. महिलांकडून सहकार्य मिळेल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. चंद्राची अनुकूलता नाही. तरीही आर्थिक आवक होईल. वाहन सुख लाभेल. खर्च कराल.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. व्यावसायिक क्षेत्रात प्राबल्य गाजवाल. पत्नीची मोलाची साथ मिळेल. अधिकार गाजवाल. स्त्री धन वाढेल.

   

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दशम स्थानी चंद्र आहे. कामाच्या ठिकाणी मन रमेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल चंद्र आहे. व्यावसायिक लाभ होतील. अडचणी दूर होतील. व्यसने आणि प्रलोभने टाळा.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या. शत्रूभय आहे. प्रेमात यश मिळेल.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) चांगला दिवस आहे. पत्नीची संपत्ती वाढेल. लेखकांना यश मिळेल. स्वतःच्या घरासाठी काही खरेदी कराल.

    

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. मोठी आर्थिक उलाढाल होईल. भागीदारी व्यवसायात लाभ होतील. दागिने सांभाळा.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल ग्रहमान आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. आप्तांची नाराजी दूर होईल. अडचणी दूर होऊ लागल्या हेत.

  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. अधिकार वाढतील. आवडत्या व्यक्तीची भेट होईल.  


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)


२९ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर चंद्र, शुक्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची वृत्ती अभ्यासू आहे. व्यक्तिमत्व विरोधाभासी आहे. इतरांना मदत करताना तुम्ही घाई करतात. प्रेमात तुम्ही रूढी मोडायला तयार असतात. तुमचा मित्र परिवार मोठा असतो. तुम्ही सावधगिरीने जीवन व्यतीत करतात. विवाह श्रीमंत व्यक्तीशी होतो. वरिष्ठ तुमच्यावर खुश असतात. वैचारिक लेखनाची जास्त आवड असते. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. तुमच्या जवळ चांगले शब्दभांडार असते. बोलण्यात तुम्ही चतुर असतात. आत्मविश्वास भरपूर असून दुर्बल लोकांना मदत करतात. विवाहानंतर भाग्योदय होतो. तुमचा भाग्योदय पाणथळ जागेजवळ होतो. तुम्ही भावनिक आणि हळवा असून लवकर अस्वस्थ होतात. कोडे सोडवण्याचा तुम्हाला छंद असतो. लॉटरी आणि शेअर्सची आवड असते. तुम्ही कष्टाळू असून योग्य निर्णय घेतात. स्वभावाने शांत असले तरी स्वतःची मताशी तडजोड करत नाहीत. अनाठायी चिंताकरणे तुम्ही टाळले पाहिजे.  भाषण, लेखन, रेडिओ, टीव्ही वरील मालीका यांची तुम्हाला आवड असते. दुसऱ्याच्या सूचनेनुसार तुम्ही अधिक चांगले काम करतात. अर्थात तुमचे स्वतंत्र विचार असतात परंतु इतरांचे विचार प्रत्यक्षात आणणे तुम्हाला अधिक आवडते. तुम्ही गर्दीत रमतात. तुम्हाला नवनवीन गोष्टींची आवड असते. प्रवास करणे आवडते. तुम्ही अत्यंत बुद्धिमान, चतुर आणि शास्त्राची आवड असणाऱ्या अहहत. तुमच्या संपर्कात येणारी व्यक्ती उत्साहित होते. तुम्ही आदर सहानुभूती आणि प्रेमाला जास्त महत्त्व देतात. तुमची इतरांवर चटकन छाप पडते. तुमचं मित्र मंडळ मोठ असतं आणि त्यांच्यासाठी तुम्ही मदतीला तयार असतात. योग्य आणि अयोग्य याची निवड तुम्ही सहज करू शकतात. तुमच्यात उत्तम कल्पनाशक्ती आहे. तुम्ही स्वातंत्र्यप्रिय आहात. सतत तुम्ही कार्यमग्न असतात. तुम्ही नम्र आहात मात्र आपले कौतुक व्हावे असे तुम्हाला मनापासून वाटते. तुमच्या वयापेक्षा अधिक वयाच्या लोकांकडे तुम्ही आकर्षित होतात.


व्यवसाय:- बँकिंग, वकील, न्यायाधीश, चार्टर्ड अकाउंटंट, सचिव, लेखन, वक्ते.


शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.


शुभ रंग:- पांढरा, निळा, जांभळा, पिवळा.


शुभ रत्न:- पाचू, मोती, हिरा. (रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली परीक्षण करून घ्यावे)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments