दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

रविवार, २९ जून २०२५

बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क 9423801280



 आणि शेवटी आज जन्मलेल्या व्यक्तीची आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची वैशिष्ट्य:-

. आषाढ शुक्ल चतुर्थी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"आज सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस आहे"  


चंद्रनक्षत्र - आश्लेषा/मघा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कर्क/ सिंह. (वज्र योग, विष्टी करणं शांती)


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा गुरू शी लाभ योग तर हर्षलशी केंद्र योग आहे. दिलेला शब्द पाळावेत. गृहकर्मे कराल. सौख्य लाभेल. नातेवाईकांचे येणे होईल. संतती शी वाद होऊ शकतो.


 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 

      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दबदबा वाढेल. अधिकारात बदल होतील. अचानक आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. तुम्ही आज एखादा निर्णय अचानक आणि आश्चर्यकारक घ्याल. मात्र त्यातून नुकसान होऊ शकते.  


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तिसरा चंद्र पहिला गुरू. कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. दानधर्म कराल. दुर्बल लोकांना मदत कराल. मन आनंदाने भरून जाईल.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अडचणी दूर होतील. स्वप्ने पूर्ण होतील. दिवस सत्करणी लावा. अध्यात्मिक प्रगती करण्यास चांगला कालावधी आहे. मनाला काहीशी विरक्ती जाणवेल.   


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 

    

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. तुमच्याच राशीत चंद्र आहे. आध्यत्मिक लाभ होतील. अनुकूल गुरू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. सामाजिक कार्यात योगदान द्याल. 


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यय स्थानी चंद्र आहे. अचानक एखादा खर्च समोर उभा राहू शकतो. मात्र तो व्यर्थ जाणार नाही. एखाद्या नवीन करार बाबतीत बोलणे होऊ शकते.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन संधी मिळतील. कामानिमित्त प्रवास घडतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण सुटतील. व्यवसाय वाढेल.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 

   

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) चंद्र अनुकूल आहे. दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. स्पर्धेत यश मिळेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. नात्यातून लाभ होतील.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 

 

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल दिवस आहे.सातवा गुरू आणि नवा चंद्र आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे आशीर्वाद लाभतील. धार्मिक कार्य कराल. पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल. अचानक एखादा जोडीदार चांगली बातमी घेऊन येईल. 

 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 


मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. षष्ठ स्थानी गुरू आहे. हरवलेली वस्तू आज सापडेल. मार्ग मोकळा होईल. जुने वाद मिटतील. संतती ची काळजी घ्या.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सातवा चंद्र आणि पाचवा गुरू ही स्थिती अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. सन्मान प्राप्त होईल. गुप्त शत्रूंचा विनाकारण त्रास होईल. मन साशंक राहील. 

 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 


मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकुल ग्रहमान आहे. मात्र षष्ठ स्थानी मंगल आणि केतू आहेत. इतरांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. स्पर्धेत यश मिळेल. चुकूनही हातून अनैतिक कामे होऊ देऊ नका. सावध रहा.


 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521


२९ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर चंद्र, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही अभ्यासू वृत्तीचे असून इतरांना शिकवणे तुम्हाला आवडते. व्यक्तिमत्व विरोधाभासी असू शकते. इतरांना मदत करताना तुमि घाईने निर्णय घेतात. तुमि सावधगिरीने वागतात. वरिष्ठ किंवा उच्च पदस्थ लोकांकडून लाभ होतात. श्रीमंत व्यक्तीशी विवाह होतो आणि त्यानंतर भाग्योदय होतो. तुमचा मित्रपरिवार मोठा असतो. लेखनाची आवड असते. वक्तृत्व उत्तम असते. बोलण्याने छाप पडते. भाषण देण्यात यशस्वी होतात. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये अधिक लोकप्रिय असतात. तुम्ही प्रगल्भ आहात. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. तुमच्याकडे दिलेले काम तुम्ही प्रयत्नपूर्वक पूर्ण करतात. तुमचे स्वतंत्र विचार असले तरी इतरांचा तुम्ही सन्मान करतात. मान-मरातब, कौतुक, प्रतिष्ठा याची तुम्हाला मनातून आवड आहे. दुरबला लोकांना मदत करणे तुम्हाला मनापासून आवडते. तुम्ही लोकांमध्ये मिसळतात. नवनवीन गोष्टी विकत घेणे, नवीन काहीतरी करून पाहणे तसेच प्रवास यांचे तुम्हाला आवड आहे. तुम्ही बुद्धिमान आहात आणि लोकप्रिय आहात. इतरांना तुमचा सहवास आवडतो. इतरांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. चांगले काय आणि वाईट काय याची तुम्हाला जाण आहे. तुम्ही मोठमोठाले प्रकल्प प्रत्यक्षात आणू शकतात. स्वतःच्या कामात व्यस्त असणे तुम्हाला आवडते. तुम्ही नम्र आहात. आणि कायदा प्रेमी आहात. तुमच्या पेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात.


व्यवसाय:- लेखक, वक्ता, राजकीय क्षेत्र, डॉक्टर, केमिस्ट, बँकिंग, वकील, अकाउंट्स, मॉल, चार्टर्ड अकाउंटंट.


शुभ दिवस:- सोमवार, गुरुवार, शुक्रवार.


शुभ रंग:- पांढरा, निळा, जांभळा, पिवळा.


शुभ रत्न:- मोती, हिरा.

 

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments