दैनिक राशिभविष्य
बुधवार, २५ जून २०२५
आणि शेवटी आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्टये:-
. ज्येष्ठ अमावस्या. वर्षा ऋतू. शके १९४७, संवत २०८१. दक्षिणायन. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
"आज अमावस्या वर्ज्य दिवस आहे" *दर्श अमावस्या*
नक्षत्र - मृगशीर्ष. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन. (वृद्धी, नाग, किंस्तुघ्न शांती)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र युती गुरू आहे. मोठा पराक्रम गाजवू शकतात. आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. लेखकांना चांगला दिवस आहे. तुमचे अधिकार वाढतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाचा झपाटा वाढेल. मन प्रसन्न राहील. नैतिक कामाना बळ मिळेल. बुद्धीचातुर्य दाखवाल. संपत्ती वाढेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तुमच्याच राशीत चंद्र आहे. धार्मिक अनुष्ठान घडेल. दानधर्माचे उत्तम फळ मिळेल. आध्यत्मिक उन्नती होईल. व्यवसाय करण्यास उत्साह वाटनार नाही.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वेळेचे महत्व ओळखा. नोकरी/व्यवसायात भरघोस वाढ होईल. सरकारी कामे मार्गी लागतील. तुमचा स्वभाव मृदू असला तरी आज तुम्ही कठोर निर्णय घ्याल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) चंद्र, रवी, गुरू अनुकूल आहेत. बढती/बदलीचे योग आहेत. वरिष्ठ खुश राहतील. मनासारखे काम होईल. सन्मान मिळतील. प्रतिष्ठा वाढेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यवसायात एक वेगळीच संधी चालून येईल. उषा वाढेल. अर्थलाभ होईल. तीर्थाटन घडेल. पित्याचे शुभ आशीर्वाद मिळतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नवम स्थानी चंद्र आहे. नवीन खरेदी होईल. अनुकूल ग्रहमान आहे. तीर्थाटन घडेल. धर्म कार्य होईल. आनंददायक घटना घडतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. नवी गणिते जुळतील. त्यातून लाभ होतील. सरकारी कामे होण्यास वेळ लागेल. येणी वसूल होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) राशीस्वामींची दृष्टी लाभली आहे. उत्तम दिवस आहे. अमावस्या असली तरी प्रगतीचा वेग चांगला असणार आहे. आरोग्याबाबत सजग व्हाल. अधिकारात वाढ होईल. पत्नीचा सल्ला मानणे हिताचे आहे. शेअर्स मध्ये यश मिळेल. मात्र गृहकलह टाळावा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सौख्य लाभेल. आनंदी राहाल. छोटी सहल घडेल. व्यवसायाचा विस्तार होईल. विनाकारण नको तेथे धाडस दाखवू नका.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) शेअर्स मध्ये आज उत्तम सौदा जमून येईल. जमीन जुमल्या चे प्रश्न सुटतील. ऐश्वर्य लाभेल. तुमच्या शब्दाला मान मिळेल. कोर्टात यश मिळू शकते.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) छंद जोपासले जातील. अर्थकारण मजबूत होईल. प्रगती होईल. योग्य उपदेश मिळेल. काही प्रलोभने टाळावी लागतील.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
२५ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर नेपच्यून, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमि एकच विषयात फार वेळ रमत नाहीत. हरहुन्नरी स्वभाव असतो. प्रवास आवडतो आणिपरदेश किंवा दूरच्या प्रदेशाशी संबंध येतो. तुम्ही प्रामाणिक आणि निष्ठावान आहात. मन चंचल असते त्यामुळे स्वभावात विसंगती आढळून येते. स्मरणशक्ती चांगली असते. नीती - अनीती यांच्या तुमच्या कल्पना वेगळ्या असतात. प्रेमात निराश अनुभवतात. संधी मिळाल्यासतुम्ही स्वतःचचे गुण दाखवू शकतात. त्यावर लोकं खुश होतात. भाषण, लिखाण आणि रेडिओ किंवा टीव्ही मालिका लेखन यातून तुम्हा यश मिळू शकते. तुम्ही मनातून कायम अस्वस्थ असतात. एकाच वेळेत तुम्ही स्वतःला बलवान आणि कमकुवत समजतात. अंगात भित्रेपणा असतो. तुम्हाला आतल्या आवाजाची देणगी आहे आणि त्याचा व्यवहारात चांगला उपयोग होतो. तुमच्या महत्वाकांक्षा अतिशय वरच्या पातळीचे असतात. तुम्हाला परंपरा फारशा आवडत नाहीत. क्रीडा, भ्रमंती, प्रवास, गिर्यारोहण याचे तुम्हाला आवड असते. इतरांना स्वतःचे विचार तुम्ही उत्तम पणे समजावून सांगतात. तुम्हाला आळशीपणा आवडत नाही. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असते आणि तुमचे विचार तर्कशुद्ध असतात. तुम्ही तुमच्या पेक्षा वरिष्ठ वर्तुळात वावरतात. सर्वसामान्य माणसाबद्दल तुम्हाला फारशी आवड नसते. आवडते पुस्तक वाचण्यात तुमचा बराच वेळ जातो. तुम्हाला स्वतःच्या कर्तव्यांची आणि अधिकाराची जाणीव आहे. तुमचा स्वभाव थोडा संशयी आहे. तुम्हाला अहंकार असतो. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन मात्र विशाल आहे. तुमच्यात व्यापारी वृत्ती आहे. तुमच्या वागण्यात मुक्तपणा असतो. मात्र इतरांना तुमच्यापासून स्फूर्ती मिळते.
व्यवसाय:- दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, आयात-निर्यात, वैद्यकीय क्षेत्र, गणित.
शुभ दिवस:- सोमवार, बुधवार, गुरुवार.
शुभ रंग:- हिरवा, पिवळा.
शुभ रत्न:- पाचू, पुष्कराज, इंद्रनील, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments
Post a Comment