दैनिक राशिभविष्य
मंगळवार, २४ जून २०२५
आणि शेवटी आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये:-
. ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी. वर्षा ऋतू. विश्ववसुनाम संवत्सर. शके१९४७, सनावत २०८१. दक्षिणायन. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
चंद्र नक्षत्र - रोहिणी/मृग. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ. (शूल/ गंड, विष्टी, शकुनी, चतुष्पाद करण शांती)
"आज वर्ज्य दिवस आहे.
मेष:- रवी - युती - गुरू आहे. कौटुंबिक सुख लाभेल. धन धान्य वाढेल. आज तुम्ही घेतलेले निर्णय आयुष्यावर चांगले परिणाम करणारे ठरतील.
वृषभ:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. सामाजिक कार्य कराल. आत्मविश्वास वाढेल. संपत्ती वाढेल. दीर्घ कालीन शेअर्स मध्ये लाभ होतील.
मिथुन:- संमिश्र ग्रहमान आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. आध्यत्मिक प्रगतीसाठी उत्तम कालावधी आहे. दानधर्म करा. सरकारी नियमांचा फटका बसू शकतो. आज जितका दानधर्म कराल तितका पुढे लाभ वाढेल.
कर्क:- लाभ स्थानी चंद्र आहे. नवीन खरेदी होईल. मन आनंदी राहील. स्वप्ने साकार होतील. रवी गुरू युतीचा अपेक्षित परिणाम मिळणार नसला तरी भविष्यातील यशाची बीजे रोवली जातील.
सिंह:- ग्रहमान प्रसन्न आहे. नोकरी, व्यवसायात उत्तम यश लाभेल. आर्थिक लाभ होतील. नोकरीत चांगले अनुभव येतील. नावलौकिक वाढेल.
कन्या:- आज तुमचा दबदबा वाढणार आहे. सरकारी कामे पूर्ण होतील. मन पवित्र विचारांनी भारून जाईल. कामाची गती वाढेल. कर्जे मंजूर होतील. आर्थिक आवक वाढेल. प्रवास घडतील.
तुळ:- अष्टम स्थानी चंद्र आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटेल. संपत्ती वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. वडिलांकडून लाभ होतील.
वृश्चिक:- उत्तम व्यावसायिक यश लाभेल. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. पत्नीची मोलाची साथ मिळेल. सरकारी कामात दिरंगाई करू नका.
धनु:- अनुकूल ग्रहमान आहे. कामात सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभ होतील. भरभराट होईल. शत्रू माघार घेतील. दीर्घकालीन शेअर्स मधून लाभ होतील.
मकर:- प्रगती साधणारा दिवस आहे. व्यवसाय वृद्धी होईल. उत्साह वाढेल. शेअर्स मधून अचानक लाभ होतील मात्र मोठी जोखीम घेऊ नका.
कुंभ:- चतुर्थ स्थानी चंद्र आहे. घरगुती कामे आज पूर्ण होतील. संतती कडून उत्तम सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणात यश लाभेल. कौतुक होईल.
मीन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. सामाजिक कामातून आनंद आणि समाधान मिळेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
२४ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही एक हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती आणि कलाकार असतात. तुमच्या कलेतून तुमचे आर्थिक प्राप्ती होते. समाजात येणे जाणे असते. नवीन योजना राबवण्याची घाई होते. मित्रांबद्दल प्रेम असते. श्रीमंत जोडीदार मिळतो आणि लग्नानंतर भाग्योदय होतो. तुम्ही कायदाप्रेमी आहात. पाण्याजवळ भाग्योदय होतो. तुमच्यात कर्तृत्व आहेमात्र काही विलक्षण घटना आयुष्यत घडतात. वयाच्या 34 व्या वर्षी उत्कर्ष होतो. स्वतंत्र विचार असल्याने प्रत्येक गोष्ट स्वतःच्या हातात असावी असे तुम्हाला वाटते. अंतर्गत आवाजाची तुम्हाला देणगी आहे. तुमचे असणे इतरांना आवडते. तुम्ही इतरांना सहजासहजी समजून येत नाहीत. रूढी, परंपरा यांची बंधने तुम्ही पाळत नाहीत. स्वतःबद्दल तुम्हाला कमालीचा आत्मविश्वास असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः घेतात. तुम्ही बोलण्यामध्ये अत्यंत चलाख आहात. जीवनात तुम्हाला चांगला मान सन्मान मिळतो. तुमचे आयुष्य आरामदायक जाते. तुमचे कपडे उच्च दर्जाचे असतात. आणि तुम्ही सुगंधी द्रव्य वापरतात. तुमचा स्वभाव संशयी आहे. उच्च वर्तुळात तुम्ही रमतात.
व्यवसाय:- संगीतकार, सराफ, व्यापार, हॉटेल मॅनेजमेंट, बेकरी, आर्किटेक्ट, मेडिकल दुकान, शेअर ब्रोकर, कमिशन एजंट, इस्टेट ब्रोकर.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- गुलाबी, निळा.
शुभ रत्न:- पाचू, मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments
Post a Comment