कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कर्मचारी कावळेसाद दरीत कोसळला..

 कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कर्मचारी कावळेसाद दरीत कोसळला..



कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क 

आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेतील एका कर्मचाऱ्याचां पाय घसरून तो ३०० फूट खोल कावळेसाद दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

मूळचे पन्हाळा तालुक्यातील माले इथले आणि सध्या रा. चिले कॉलनी   इथं राहणारे राजेंद्र बाळासो सनगर हे त्यांच्या १४ सहकाऱ्यांसोबत आंबोली इथं वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. कावळेसाद पॉईंट येथे रोलिंगजवळ उभे असताना त्यांचा पाय अचानक घसरून ते दरीत कोसळले. गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे यांनी या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल मनीष शिंदे आणि इतर पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 

त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. मात्र, रात्रीचा काळोख आणि दाट धुक्यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. काळोख आणि दाट धुक्यामुळे शुक्रवारी सायंकाळी शोध मोहीम राबवणे शक्य नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे राजेंद्र सनगर यांच्या शोध मोहिमेला शनिवार सकाळपासून सुरुवात करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

Comments