अपार्टमेंटच्या ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर : स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास

अपार्टमेंटच्या ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर : स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास 

कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक ८१ क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील अरिहंत अपार्टमेंट यांच्या ड्रेनेजचे मैला युक्त पाणी पाणी गेली आठ दिवस विशाल नगर कॉलनीतील रस्त्यावरून वाहत आहे. 
त्यामुळे येथील नागरिकांना दुर्गंधीचा व रोगराईचा सामना करावा लागत आहे. कॉलनीतील नागरिकांनी मनसेचे जिल्हा सचिव निलेश आजगावकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आज त्यांनी अरिहंत अपार्टमेंटचे चेअरमन डॉ. वैशाली मुगडे व महानगरपालिकेचे अधिकारी यांना प्रत्यक्ष जागेवर बोलवून घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले. अरिहंत अपार्टमेंट मध्ये जवळपास ५५ फ्लॅट धारक व ३६ गाळे धारक असून त्या अनुषंगाने ड्रेनेजचे पाणी निर्गत करण्यासाठी योग्य ती काळजी घेतली नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर नागरिकांचा रोष व वस्तुस्थिती पाहून महानगरपालिकेचे अधिकारी यांनी अरिहंत अपार्टमेंटला नोटीस देऊन दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले व तत्काळ याबाबत चेंबरचे काम करून घेण्याच्या सूचना महानगरपालिका अधिकाऱ्यांनी संबंधित अपार्टमेंटच्या चेअरमन यांना दिल्या.
यावेळी शोभा कोळी, उज्वला आंबले, सुनीता खोत, सविता कोळी, वंदना हुजरे, वनिता बारापात्रे, शोभा वागरे,लता कोंडेकर,शिल्पा कुलकर्णी, सीमा चाफोडीकर, स्वाती पाटील, सदाशिव कोळी, आनंदा खोत व नागरिक उपस्थित होते.

Comments